निवडणूक प्रचारादरम्यान बांसुरी स्वराज जखमी, डोळ्याला दुखापत

भाजपच्या उमेदवारांनी मोदी सरकारचे तिसऱ्यांदा स्थापन करण्यासाठी निवडणूक प्रचारात आपले प्रयत्न करत आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार बांसुरी स्वराज या देखील त्यांच्या जागेवरून जनसंपर्कात व्यस्त आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान बांसुरी स्वराज जखमी, डोळ्याला दुखापत

भाजपच्या उमेदवारांनी मोदी सरकारचे तिसऱ्यांदा स्थापन करण्यासाठी निवडणूक प्रचारात आपले प्रयत्न करत आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार बांसुरी स्वराज या देखील त्यांच्या जागेवरून जनसंपर्कात व्यस्त आहे. या दरम्यान बांसुरी यांचा अपघात झाला. त्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्या जखमी झाल्या आहे.याची माहिती खुद्द भाजपच्या नेत्याने फोटोसह शेअर केली आहे. 

भाजप उमेदवार बांसुरी यांनी रात्री उशिरा ट्विटरवर एका डॉक्टरसोबतचा फोटो पोस्ट केला असून मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले. मोती नगर भागात एका डॉक्टरने त्यांच्यावर उपचार केल्याचे त्यांनी सांगितले, त्याबद्दल बांसुरी यांनी डॉक्टरचे आभार मानले. 

 

बांसुरी स्वराज या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत, पक्षाने केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी दिली आहे. बांसुरी स्वराज हे पेशाने वकील आहेत. त्यांनी ब्रिटनमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. बांसुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहेत. यावेळी पक्षाने त्यांना नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

 

 Edited by – Priya Dixit 

 

 

Go to Source