हनीट्रॅपच्या जाळ्यात बँक मॅनेजर : चौघे अटकेत
संबंधित महिलेच्या मुलाचाही सहभाग
वार्ताहर/विजापूर
इंडी येथील डीवायएसपी कार्यालयाच्या शेजारी अनेक वर्षे नारळ पाणी विकणारी एक महिला अचानक चुकीच्या मार्गाला जात सदर महिलेने बँक मॅनेजरला जाळ्यात ओढून हनीट्रॅप प्रकरणात अडकविले. यानंतर मॅनेजरला धमकावून 10 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला. पण इंडी पोलिसांकडे तक्रार येताच पोलिसांनी तात्काळ तपास करताना सदर महिलेला तुरुंगाची हवा खायला लावली. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात तिचा मुलगाही सहभागी आहे. या दोघांसह एक युट्यूब पत्रकार व आणखी एक सहकारीही सहभागी झाला होता. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, इंडी तालुक्यातील अंजुटगी गावातील रहिवासी असलेल्या बँक मॅनेजरला जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत 10 लाखांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
हनीट्रॅप रचून धमकावणारी सदर महिला, तिचा मुलगा, आणखी एक साथीदार आणि युट्यूब पत्रकार अशा चौघांविरुद्ध इंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. इंडीतील डीवायएसपी कार्यालयाजवळ फुटपाथवर सुवर्णा होनसुरे नावाची महिला नारळ पाणी विकत होती.दरम्यान सुवर्णा हिने नारळ पाणी प्यायला येणाऱ्या बँक मॅनेजर प्रताप हरणय्या (नाव बदललेले) याच्याशी ओळख वाढवत गेली. या ओळखीतून 1 नोव्हेंबर 2025 रोजी तिने त्याला गोड बोलून बोलावले. त्यानंतर त्या महिलेने मॅनेजरला आपल्या मैत्रिणीच्या घरी नेऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र चार दिवसानंतर 5 नोव्हेंबर रोजी फोन करून आपल्या प्रेमप्रसंगाचा व्हिडिओ पत्रकारांनी काढला असून ते आपल्याला धमकावत आहेत. यामुळे त्यांना भेटून व्यवहार मिटवून टाका, असे सांगितले.
दरम्यान 12 नोव्हेंबरला बँक
मॅनेजरने इंडी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती. यानुसार पोलिसांनी तपास हाती घेताना सुवर्णा होनसूरे, अमूल होनसूरे, महेश बगली, तौसिफ करोशी या चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महिलेनेच केला होता व्हिडिओ
सुवर्णानेच मॅनेजरसोबतचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. त्यानंतर तिने आपल्या परिचयातील महेश बगली, युट्यूब पत्रकार म्हणून काम करणारा तौसिफ करोशी यांच्यामार्फत सदर मॅनेजरला फोन करून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. या कटात सुवर्णा हिचा मुलगा अमूल होनसुरे देखील सहभागी होता.
Home महत्वाची बातमी हनीट्रॅपच्या जाळ्यात बँक मॅनेजर : चौघे अटकेत
हनीट्रॅपच्या जाळ्यात बँक मॅनेजर : चौघे अटकेत
संबंधित महिलेच्या मुलाचाही सहभाग वार्ताहर/विजापूर इंडी येथील डीवायएसपी कार्यालयाच्या शेजारी अनेक वर्षे नारळ पाणी विकणारी एक महिला अचानक चुकीच्या मार्गाला जात सदर महिलेने बँक मॅनेजरला जाळ्यात ओढून हनीट्रॅप प्रकरणात अडकविले. यानंतर मॅनेजरला धमकावून 10 लाख रुपयांची रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला. पण इंडी पोलिसांकडे तक्रार येताच पोलिसांनी तात्काळ तपास करताना सदर महिलेला तुरुंगाची हवा खायला लावली. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात तिचा मुलगाही सहभागी आहे. या दोघांसह एक युट्यूब पत्रकार व आणखी एक सहकारीही सहभागी झाला होता. याबाबत समजलेली […]
