राम नवमीला बँकांना सुट्टी
संपूर्ण भारतात 17 एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे. देशात अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. बँक ही नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. बॅंक खाते उघडणे, पैसे काढणे व भरणे, कर्जाचे हफ्ते, अश्या अनेक कामांसाठी नागरिक बँकेत जात असतात. तसेच भारत अनेक राज्यांमध्ये रामनवमीच्या सुट्टी असते. यावेळी बँक देखील बंद राहणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक ऑफिशियल हॉलिडे कॅलेंडरमध्ये असे दाखवले आहे की, अनेक राज्यांमध्ये रामनवमी करीत सार्वजनिक बँक आणि खाजकी बँक या दोन्ही बंद राहतील. तसेच काही बँक सुरु राहतील. राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असतात. रामनवमी हे पर्व खूप मोठे मानले जाते. तसेच रामनवमी हे पर्व देशात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. म्हणूनच या दिवशी देशात मुंबई, नागपूर, पाटणा, रांची, शिमलाओन, भोपाळ, भुवनेश्वर, अहमदाबाद, बेलापूर, जयपूर, कानपूर, लखनौ, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद ,तेलंगणा येथे रामनवमी निमित्त बँकांना सुट्टी राहणार आहे.
