बेंगळूर टेनिस स्पर्धा ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
एटीपी टूरवरील येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या बेंगळूर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉनुसार भारताच्या सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन यांना पहिल्याच फेरीत फ्रान्सचे टेनिसपटू अनुक्रमे जेफ्री ब्लँकेनॉक्स आणि मॅकजीमी जेनव्हीर यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
सुमीत नागलने यापूर्वी तीन वेळेला ब्लँकेनॉक्सचा पराभव केला आहे. जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पात्र फेरीमध्ये नागलने त्याचा पराभव केला होता. भारताचा रामकुमार रामनाथन आणि फ्रान्सचा जेनव्हीर यांच्यात आतापर्यंत 2 सामने झाले असून उभयताने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. एटीपी चॅलेंजर बेंगळूर खुली टेनिस स्पर्धा कर्नाटक लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित केली आहे. सदर स्पर्धा 18 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
Home महत्वाची बातमी बेंगळूर टेनिस स्पर्धा ड्रॉ जाहीर
बेंगळूर टेनिस स्पर्धा ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर एटीपी टूरवरील येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या बेंगळूर खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉनुसार भारताच्या सुमित नागल आणि रामकुमार रामनाथन यांना पहिल्याच फेरीत फ्रान्सचे टेनिसपटू अनुक्रमे जेफ्री ब्लँकेनॉक्स आणि मॅकजीमी जेनव्हीर यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. सुमीत नागलने यापूर्वी तीन वेळेला ब्लँकेनॉक्सचा पराभव केला आहे. जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पात्र […]
