बेंगळूर मॅरेथॉन स्पर्धा रविवारी

बेंगळूर येथे रविवारी 16 वी टीसीएस विश्व 10 कि. मी. पल्ल्याची बेंगळूर मॅरेथॉन स्पर्धा होणार असून यामध्ये विदेशातील अनेक अव्वल महिला धावपटू सहभागी होणार आहेत. केनियाची विश्वविक्रमवीर महिला धावपटू इमाक्युलेटी अनयानगो अॅकोल ही या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिल. बेंगळूरमधील ही मॅरेथॉन प्रतिष्ठेची समजली जाते. विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोडरेस असे या मॅरेथॉनचे नामकरण करण्यात आले […]

बेंगळूर मॅरेथॉन स्पर्धा रविवारी

बेंगळूर
येथे रविवारी 16 वी टीसीएस विश्व 10 कि. मी. पल्ल्याची बेंगळूर मॅरेथॉन स्पर्धा होणार असून यामध्ये विदेशातील अनेक अव्वल महिला धावपटू सहभागी होणार आहेत. केनियाची विश्वविक्रमवीर महिला धावपटू इमाक्युलेटी अनयानगो अॅकोल ही या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिल.
बेंगळूरमधील ही मॅरेथॉन प्रतिष्ठेची समजली जाते. विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोडरेस असे या मॅरेथॉनचे नामकरण करण्यात आले असून विजेत्यांसाठी एकूण बक्षीसाची रक्कम 210,000 अमेरिकन डॉलर्स ठेवण्यात आली आहे. केनियाची महिला धावपटू तसेच महिलांच्या 10 कि. मी. पल्ल्याच्या शर्यतीतील दुसऱ्या क्रमांकाची विश्वविक्रमवीर अॅकोलने व्हॅलेनसियात झालेल्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करताना 28 मिनिटे 57 सेकंदाचा विक्रम केला होता. व्हॅलेन्सियातील स्पर्धेत केनियाच्या अॅग्नेस निगेटीने 28 मिनिटे 46 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदवत पहिले स्थान मिळविले होते. बेंगळूर मॅरेथॉनमध्ये लिलियन कॅसेट, फेत चिपकोच, लॉयसी चेमुंग, सिनिटा चेपनिगेनो आणि ग्रेस नेओवुना यांचा समावेश राहिल.
बेंगळूर मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या इलाईट विभागात केनियाचा पीटर अलिया, ब्रेविन किपटू, हिलेरी, चेपकवुने, पॅट्रीक मोसिन, टांझानियाचा जॉन विली, इथोपियाचा बोकी दिरीबा सहभागी होत आहेत. बेंगळूर मॅरेथॉनमधील पुरुष आणि महिलांच्या विभागातील विजेत्यांना प्रत्येकी 26 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस तसेच त्याचशिवाय 8000 अमेरिकन डॉलर्सचा बोनसही मिळणार आहे.