बळ्ळारी नाला सर्वेक्षण लवकरच

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : बळ्ळारी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नाल्याचे पाणी परिसरातील शेकडो एकर शेतवडीमध्ये साचत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची तक्रार अनेकवेळा करण्यात आली असून, लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. […]

बळ्ळारी नाला सर्वेक्षण लवकरच

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव : बळ्ळारी नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नाल्याचे पाणी परिसरातील शेकडो एकर शेतवडीमध्ये साचत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची तक्रार अनेकवेळा करण्यात आली असून, लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बळ्ळारी नाल्यामुळे होणाऱ्या पीकहानीची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नाला व परिसराची लवकरच पाहणी करणार आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून माहिती घेतली जाणार आहे. नाल्यांच्या पाण्यामुळे शेकडो एकर जमिनीतील पिकांची हानी होत असेल तर यावर उपाययोजना राबविल्या जातील. तत्पूर्वी स्थानिक नागरिक, नेते, शेतकरी यांच्याशी चर्चा करून ही समस्या निकालात काढली जाईल, असे त्यांनी सांगितले.