संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहंरीमधुनी शिळ घालतो वारा

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

कुरळ्या लहंरीमधुनी

शिळ घालतो वारा

 

दुर कमान पुलाची

एकलीच अंधारी

थरथरत्या पाण्याला

कसले गुपीत विचारी

 

भरुन काजव्याने हा

चमके पिंपळ सारा

स्तिमीत होऊनी तेथे

अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची

निरवतेस किनारी

ओढ लागुनी छाया

थरथरते अंधारी

मध्येच क्षितीजावरुनी

विज लकाकुन जाई

अन ध्यानस्थ गिरी ही

उघडुनी लोचन पाही

हळुच चांदने ओले

थिबके पाणावरुनी

कसला क्षन सोनेरी

उमले प्राणामधुनी

 

संथ निळे हे पाणी

वर शुक्राचा तारा

दरवळला गंधाने

मओनाचा गाभारा

 

कवी- मंगेश पाडगांवकर