शहरात बकरी-ईद उत्साहात साजरी
बेळगाव : शहर परिसरात सोमवारी मुस्लीम बांधवांकडून बकरी-ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव एकत्रित आले होते. प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक असणारा बकरी-ईद सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदादेखील शहर परिसरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण झाले. नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. धर्मगुरुंनी मुस्लिमांना संदेश देत सर्वधर्मियांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत, असे सांगितले. सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनादेखील केली. शहर परिसरात बकरी-ईद निमित्ताने मुस्लीम बांधवांमध्ये उत्साह दिसून आला.
Home महत्वाची बातमी शहरात बकरी-ईद उत्साहात साजरी
शहरात बकरी-ईद उत्साहात साजरी
बेळगाव : शहर परिसरात सोमवारी मुस्लीम बांधवांकडून बकरी-ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव एकत्रित आले होते. प्रेम आणि बलिदान यांचे प्रतीक असणारा बकरी-ईद सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदादेखील शहर परिसरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण झाले. नमाज पठणानंतर […]
