Winter Special Recipe: बाजरीची खिचडी

साहित्य- 1/2 कप बाजरी, 1 मूठ तांदूळ 1 मूठ मूग डाळ हिंग तूप जिरे

Winter Special Recipe: बाजरीची खिचडी

साहित्य-

1/2 कप बाजरी,

1 मूठ तांदूळ 

1 मूठ 

मूग डाळ 

हिंग

तूप

जिरे 

अर्धा चमचा हळद 

चवीनुसार मीठ 

 

कृती- 

सर्वात आधी बाजरी स्वच्छ करून हलकीशी बारीक करून घ्यावी. आता बाजरी 5-6 तास पाण्यात भिजत ठेवावी. तसेच पाणी काढून टाकल्यानंतर मिक्सरमध्ये एकदाच फिरवा. आता कुकरमध्ये बाजरी, मूग डाळ, तांदूळ आणि मीठ आणि हळद घालून गॅसवर ठेवावे. कुकरमध्ये दोन वाट्या पाणी टाकून खिचडी 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. कढईत तूप गरम करून खिचडीसाठी फोडणी तयार करावी. तूप गरम झाल्यावर त्यात हिंग व जिरे घालावे. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. आता तयार केलेला फोडणी खिचडीवर घालावी. तर चला तयार आहे आपली बाजरीची खिचडी रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik