दोन खटल्यांमध्ये म.ए.समितीच्या कार्यकर्त्यांना जामीन

बेळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले. त्यानंतर ती बस बेळगावात दाखल झाल्यानंतर तिचे स्वागत म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. मदन बामणे, गणेश द•ाrकर, सुरज कणबरकर अशी जामीन मंजूर […]

दोन खटल्यांमध्ये म.ए.समितीच्या कार्यकर्त्यांना जामीन

बेळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिण्यात आले. त्यानंतर ती बस बेळगावात दाखल झाल्यानंतर तिचे स्वागत म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला आहे. मदन बामणे, गणेश द•ाrकर, सुरज कणबरकर अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने या सर्वांना जामीन मंजूर केला. या खटल्यामध्ये कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. एम. बी. बेंद्रे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.
1 नोव्हेंबर खटल्यातही मिळाला जामीन
1 नोव्हेंबर 2018 रोजी मूक सायकल फेरी काढण्यात येत होती. त्यावेळी घोड्यावर बंदूक घेऊन मिरवणुकीमध्ये राजप्रसाद पवार सामील झाले होते. याचबरोबर रमेश हिरोजी, सुरज कणबरकर देखील त्या ठिकाणी होते. त्यामुळे या तिघांवर मार्केट पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यामध्येही या सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.