बदलापूर : वाढदिवसाला बोलावून ड्रिंक मध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार

महिलांवर अत्याचाराचे प्रकरण कमीच होत नाही आहे. बदलापूरातुन तरुणीवर तिच्या 2 मित्राने सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

तरुणीची ओळख शिरगाव मध्ये राहणाऱ्या एका मुलीशी झाली तिने 4 सप्टेंबर रोजी  पीडितेला आणि दोन मित्रांना वाढदिवसाच्या पार्टीसाठी घरी बोलावले. पार्टी रात्रभर सुरु होती. मुलीने पीडित मुलीच्या ड्रिंक मध्ये भूल देण्याचे औषध मिसळले. ते ड्रिंक प्यायल्यावर पीडित तरुणी बेशुद्ध झाली.तीला बेशुद्धावस्थेत पाहता त्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. 

सकाळी मुलगी परत घरी न आल्याने तिच्या पालकांनी तिच्या मैत्रिणीला फोन केला.तेव्हा पीडितेच्या मैत्रिणीने पीडित तरुणी दारू पिऊन इथेच असल्याचे त्यांना सांगितले. तिचे पालक तिला घेऊन आले नंतर तिला शुद्ध आल्यावर तिला बलात्कार झाल्याचे लक्षात आले. तिने हा प्रकार पालकांना सांगितला. 

आई वडील तिला घेऊन पोलीस ठाण्यात गेले आणि पीडितेने पोलिसांना घडलेलं सर्व सांगितले. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रिणीवर आणि दोन्ही मित्रांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.  

Edited by – Priya Dixit

Go to Source