पिरनवाडीनजीकचा नाला कचऱ्याने भरल्याने दुर्गंधी

आरोग्य धोक्यात : नाला स्वच्छतेची मागणी बेळगाव : पिरनवाडी गावच्या प्रवेशद्वारातील नाला कचऱ्याने तुडूंब भरल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील रहिवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाला महानगरपालिकेच्या हद्दीचा शेवटचा पाईंट समजले जाते. तेथून पिरनवाडी नगरपंचायतीची हद्द सुरू होते. अशी परिस्थिती असल्याने सदर नाल्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नाल्याला औद्योगिक वसाहतीकडून येणारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी व […]

पिरनवाडीनजीकचा नाला कचऱ्याने भरल्याने दुर्गंधी

आरोग्य धोक्यात : नाला स्वच्छतेची मागणी
बेळगाव : पिरनवाडी गावच्या प्रवेशद्वारातील नाला कचऱ्याने तुडूंब भरल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील रहिवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नाला महानगरपालिकेच्या हद्दीचा शेवटचा पाईंट समजले जाते. तेथून पिरनवाडी नगरपंचायतीची हद्द सुरू होते. अशी परिस्थिती असल्याने सदर नाल्याकडे दुर्लक्ष झाले आहे. नाल्याला औद्योगिक वसाहतीकडून येणारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी व पिरनवाडी गावातील दूषित पाणी  जोडल्याने सर्व दूषित पाणी आणि त्यामध्ये कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरुन महामार्गावरून ये-जा करणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नाल्याची पाहणी करून स्वच्छता करून घ्यावी व छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कामगारांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.