दिव्यांग आणि दृष्टिहीन बांधवांच्या थकीत मानधनासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. १९ मे पर्यंत प्रश्न न सुटल्यास मंत्रालयात आंदोलन करण्याचा पवारा त्यांनी घेतला आहे.
तसेच छत्रपती संभाजीनागरमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेदरम्यान एका दिव्यांग महिलेच्या मठांवर बुलडोझर चालवण्यात आला, तसेच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून कडू यांनी तातडीने भेट घेत महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.
माजी आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिव्यांग, दृष्टिहीन आणि निराधार बांधवांच्या थकीत मानधनच्या प्रश्नावर सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. १९ मे २०२६ पर्यंत समस्या सुटली नाही तर मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दिव्यांगांच्या मानधनात वाढ (पूर्वी ६००० रुपये करण्याची मागणी), वेळेवर वितरण आणि थकीत रक्कम त्वरित देण्याची मुख्य मागणी आहे. बच्चू कडू दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवतात. यापूर्वीही त्यांनी मानधन वाढीसाठी १५००-२५०० पर्यंत वाढ झाली असली तरी ६००० पर्यंत नेण्याची मागणी केली होती.
सध्या थकीत मानधन, UDID कार्ड संबंधित अडचणी आणि निधी वितरणातील गोंधळ यामुळे दिव्यांग संघटनांमध्ये नाराजी आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात प्रहार संघटना या मुद्द्यावर सक्रिय आहे.
ALSO READ: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, महिला व बाल विकास विभागात डिजिटल बदली प्रणाली लागू
१९ मे ही तारीख महत्त्वाची आहे. जर सरकारने तत्काळ पावले उचलली नाहीत तर मंत्रालयासमोर मोठे आंदोलन होऊ शकते. बच्चू कडूंचा राजकीय इतिहास पाहता ते आंदोलनात्मक पवित्रा घेतात आणि मागण्या मान्य करवून घेतात.
ALSO READ: इंदापूर शेतकरी आंदोलन: पाणी प्रश्नावरून इंदापूरचे शेतकरी आक्रमक; १० मे पासून कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करणार
Edited by-Dhanashri Naik