बाबुश मोन्सेरात यांचा दावा चुकीचा

उत्पल पर्रीकर यांचा ठपका : दर्जा, खर्चाची चौकशी व्हावी पणजी : उत्पल मनोहर पर्रीकर यांनी पणजीतील काही स्मार्ट कामांची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी ‘90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा’ मंत्री बाबुश मोन्सेरात यांचा दावा चुकीचा असल्याचे नमूद केले. कामे पूर्ण होण्यासाठी योग्य आणि खरी-खुरी मुदत देण्यात यावी, फसवी नको, असेही पर्रीकर म्हणाले. पणजीतील काही कामे 2 वर्षे […]

बाबुश मोन्सेरात यांचा दावा चुकीचा

उत्पल पर्रीकर यांचा ठपका : दर्जा, खर्चाची चौकशी व्हावी
पणजी : उत्पल मनोहर पर्रीकर यांनी पणजीतील काही स्मार्ट कामांची पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी ‘90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा’ मंत्री बाबुश मोन्सेरात यांचा दावा चुकीचा असल्याचे नमूद केले. कामे पूर्ण होण्यासाठी योग्य आणि खरी-खुरी मुदत देण्यात यावी, फसवी नको, असेही पर्रीकर म्हणाले. पणजीतील काही कामे 2 वर्षे झाली तरी पूर्ण होत नाहीत, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या कालावधीत इमारत, पूल पूर्ण होतात मग ही पणजीतीलच कामे का होत नाहीत? असा सवाल पर्रीकर यांनी केला आहे. पणजीतील स्मार्ट सिटी कामांचा केव्हा तरी आढावा घेण्यात येतो. त्यात सातत्य कुठेच दिसत नाही. निदान 15 दिवसांनी तरी एक आढावा बैठक घेण्याची गरज पर्रीकर यांनी वर्तवली.
दर्जाची, खर्चाची तपासणी करा
पणजीच्या सर्व स्मार्ट सिटी कामांची चौकशी आणि हिशोब तपासणी करण्याची मागणी उत्पल पर्रीकर यांनी केली आहे. अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यांच्या पुर्ततेसाठी योग्य ती मुदत देण्यात आली पाहिजे. स्मार्ट सिटीची कामे करणारे कंत्राटदार योग्य क्षमतेचे नाहीत आणि त्यांच्याकडे कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा नाही. कामाचा दर्जाही चांगला नाही. त्यामुळे चौकशी आणि केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी झालीच पाहिजे, असेही पर्रीकर म्हणाले.
पणजीची अवस्था बिकट
राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीची विविध कामे 31 मे ची मुदत संपली तरी चालूच आहेत. काही कामे नव्याने सुऊ करण्यात आली आहेत, तर काही कामे वर्ष उलटले तरी पूर्ण झालेली नाहीत, अशी या पणजीची अवस्था आहे. पणजी ‘स्मार्ट’ तर दिसत नाहीच उलट ठिकठिकाणी रस्त्याच्याकडेला बांधकामाच्या साहित्यांचे व मातीचे ढिगारे, पाईप्स पडलेले दिसून येत आहेत. आता नव्याने कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही आणि अर्धवट राहिलेली व नव्याने सुऊ केलेली कामे कधी पूर्ण होणार याचा पत्ता कोणालाच नसल्याचे सांगण्यात आले.