बाबा सिद्दीकींना मारण्यासाठी आरोपींची 3 महिन्यापासून प्लॅनिंग
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीक यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. घटना घडली त्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र, यावेळी अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार झाला. दरम्यान, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या घटनेचा तपशील मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी तीन महिन्यांपासून बाबा सिद्दीकीला मारण्याचा कट रचत होते. आरोपी अनेकवेळा बाबा सिद्दीकीच्या घरी शस्त्राशिवाय गेले. तसेच या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 15 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीश हा मध्यस्थ म्हणून काम करायचा. तर अटक करण्यात आलेले आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर (फरार आरोपी) यांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम चौथा आरोपी हरीश याच्यामार्फत दिल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.गोळीबार करणाऱ्यांना पैशांसह दोन मोबाईल देण्यात आलेबाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी शूटर्सना दोन मोबाईल फोन्ससह पैसे देण्यात आले होते. हरीश गेल्या 9 वर्षांपासून पुण्यात राहत होता. आरोपीने चॅटिंग आणि कॉलिंगसाठी सोशल मीडिया ॲप्सचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच आरोपी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूटिंग शिकले, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.शूटिंग सराव आणि कॉलिंगसाठी Instagram वापरलेबाबा सिद्दीकीच्या हत्येबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी तीन महिन्यांपूर्वी कट रचला होता. व्हिडिओ पाहून आरोपीने शूटींग शिकले होते. तसेच, आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅपचॅट ॲपचा वापर केला आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केला.हेही वाचामहाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार विधानसभा निवडणूक
वसई विरारच्या राजकारणात मोठा उलटफेर
Home महत्वाची बातमी बाबा सिद्दीकींना मारण्यासाठी आरोपींची 3 महिन्यापासून प्लॅनिंग
बाबा सिद्दीकींना मारण्यासाठी आरोपींची 3 महिन्यापासून प्लॅनिंग
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीक यांची 12 ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. घटना घडली त्याच दिवशी पोलिसांनी दोघांना अटक केली. मात्र, यावेळी अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार झाला. दरम्यान, याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या घटनेचा तपशील मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी तीन महिन्यांपासून बाबा सिद्दीकीला मारण्याचा कट रचत होते. आरोपी अनेकवेळा बाबा सिद्दीकीच्या घरी शस्त्राशिवाय गेले. तसेच या हत्येचे संपूर्ण नियोजन पुण्यात करण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 15 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हरीश हा मध्यस्थ म्हणून काम करायचा. तर अटक करण्यात आलेले आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर (फरार आरोपी) यांनी अटक केलेल्या शूटर गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम चौथा आरोपी हरीश याच्यामार्फत दिल्याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला आहे.
गोळीबार करणाऱ्यांना पैशांसह दोन मोबाईल देण्यात आले
बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी शूटर्सना दोन मोबाईल फोन्ससह पैसे देण्यात आले होते. हरीश गेल्या 9 वर्षांपासून पुण्यात राहत होता. आरोपीने चॅटिंग आणि कॉलिंगसाठी सोशल मीडिया ॲप्सचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
तसेच आरोपी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पाहून शूटिंग शिकले, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
शूटिंग सराव आणि कॉलिंगसाठी Instagram वापरले
बाबा सिद्दीकीच्या हत्येबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी तीन महिन्यांपूर्वी कट रचला होता. व्हिडिओ पाहून आरोपीने शूटींग शिकले होते. तसेच, आरोपींनी चॅटिंगसाठी स्नॅपचॅट ॲपचा वापर केला आणि कॉलिंगसाठी इन्स्टाग्रामचा वापर केला.हेही वाचा
महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार विधानसभा निवडणूकवसई विरारच्या राजकारणात मोठा उलटफेर