बी. ए. स्पोर्ट्समधून क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी! शिवाजी विद्यापीठात चार वर्षाचा अभ्यासक्रम

अत्याधुनिक प्रशिक्षणासह अनेक सुविधा मिळणार अहिल्या परकाळे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतवर्षीपासूनच केली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच बारावीनंतर बी. ए. स्पोर्ट्ससारखा महत्वाचा चार वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी 60 प्रवेश क्षमता असून गतवर्षी 34 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी व्दितीय वर्षात प्रवेश घेतला आहे. जीम, […]

बी. ए. स्पोर्ट्समधून क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी! शिवाजी विद्यापीठात चार वर्षाचा अभ्यासक्रम

अत्याधुनिक प्रशिक्षणासह अनेक सुविधा मिळणार

अहिल्या परकाळे कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतवर्षीपासूनच केली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच बारावीनंतर बी. ए. स्पोर्ट्ससारखा महत्वाचा चार वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी 60 प्रवेश क्षमता असून गतवर्षी 34 विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी व्दितीय वर्षात प्रवेश घेतला आहे. जीम, योगा शिक्षक, फिटनेस कन्सल्टंट, खेळाचे समालोचन (कॉमेंट्री) अशा क्रीडा क्षेत्रातील नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. प्रत्येक विषयाला 50 टक्के थेअरी आणि 50 टक्के प्रॅक्टिकल असल्याने प्रत्यक्ष ग्राऊंडवर खेळाचा सराव करता येतोय. त्यामुळे यंदा बी. ए. स्पोर्ट्स अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे.
स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यासाठी बीपीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. बी. ए. (पदवी) नंतर बीपीएडला प्रवेश मिळतो. पण यामध्ये आयुष्याची 20 वर्षे जातात. परंतू आता वयाच्या 17 व्या वर्षापासूनच विद्यापीठात स्पोर्ट्सचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असल्याने 8 सेमिस्टरमध्ये परीक्षा होणार आहे. प्रत्येक सेमिस्टरला 22 व्रेडीट आणि 550 गुण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीनंतर बी. ए. स्पोर्ट्सला प्रवेश घेतला तर चार वर्षात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतील. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह बांधण्याचे काम सुरू केले आहे. स्पोर्ट्स अभ्यासक्रमाविषयी विद्यापीठ प्रशासन सातत्याने जनजगृती करीत आहे. यंदा दुसरे वर्ष सुरु होणार असल्याने दोन वर्षाचा अभ्यासक्रम तयार आहे. तर पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम तयार होणार आहे. यातून बीपीएड शिक्षणाचा पाया पक्का केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना करिअरची नामी संधी मिळणार आहे.
आपआपल्या आवडीच्या खेळात पारंगत होता येते
बी. ए. स्पोर्टस्ला प्रवेश घेतल्यानंतर आवडीच्या खेळाचा सराव करता येणार आहे. तसेच प्रवेश मिळाल्यानंतर वसतिगृहात राहण्याची सोय केली जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या खेळांचे अत्याधुनिक पध्दतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्यामुळे खेळाडूंना आपआपल्या आवडीच्या खेळात पारंगत होण्यास मदत होईल. यासाठी विद्यापीठात परिसरात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कँपला जाण्याची संधी मिळेल.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्ही जिल्ह्यातील खेळाडूंनी बी. ए. स्पोर्ट्ससाठी प्रवेश घ्यावा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जातेय. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना मोफत वसतिगृह उपलब्ध करून दिले जात आहे.
                                                                 डॉ. शरद बनसोडे (शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, शिवाजी विद्यापीठ)
प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम
सेमिस्टर 1- स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, प्रॅक्टिकल ट्रॅक अॅन्ड फिल्ड, प्रॅक्टिकल्स योगा, कॉम्प्युटर अॅप्लीकेशन, प्रॅक्टिकल्स अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, इंग्लिश, सोशल मोरल एज्युकेशन, इंडियन फिलॉसॉफी ऑफ फिजिकल एज्युकेशन, कम्युनिकेशन स्किल हा अभ्यासक्रम आहे. याला 22 व्रेडिट व 550 गुण आहेत.
सेमिस्टर 2- स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, बेसिक फिजिकल फिटनेस ट्रेनिंग, प्रॅक्टिकल्स ट्रॅक अॅन्ड फिल्ड, प्रॅक्टिकल्स योगा, स्पोर्ट्स जर्नालिझम आणि स्पोट्स सायकॉलॉजी, प्रॅक्टिकल्स अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोरल एज्युकेशन, सोशल एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या सेमिस्टरला 22 व्रेडीट व 550 गुण आहेत.
व्दितीय वर्षाचा अभ्यासक्रम
सेमिस्टर 3- स्पोर्ट (इन्फर्मेशन टू स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स), स्पोर्ट्स एज्युकेशन (स्पोर्ट्स ट्रेनिंग), फिजिकल एज्युकेशन (हिस्ट्री ऑफ ऑलंपिक), सेल्फ डेफिनेशन ट्रेनिंग(रक्शा), अॅथलेटिक्स (टॅक अॅन्ड फिल्ड), जिम्नॅस्टिक, इंग्लिश, हिस्ट्री ऑफ फिजिकल एज्युकेशन इन इंडिया, या अभ्यासक्रमाला 22 क्रेडीट आहेत.
सेमिस्टर 4-
स्पोर्ट्स एज्युकेशन (अॅथलॅटिक्स केअर अॅन्ड रिहॅबिलिटेशन), स्पोर्ट्स एज्युकेशन (इन्ट्रोडक्शन टू स्पोर्ट ऑफिसेटींग), फिजिकल एज्युकेशन (ऑर्गनायझेशन अॅन्ड अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मॅटस अॅन्ड टुर्नामेंटस), रिक्रेशन अॅन्ड लेसर मॅनेजमेंट, अॅथलेटिक्स (ट्रॅक अॅन्ड फिल्ड), जिम्नॅस्टिक्स, इंग्लिश, एन्व्हायर्नमेंट स्टडी या अभ्यासक्रमाला 22 क्रेडीट आहेत.