नैर्त्रुत्य रेल्वेची बेळगावातून पुढील महिन्यात अयोध्या फेरी

17 फेब्रुवारीला रेल्वे बेळगावमधून निघणार बेळगाव : अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवार दि. 22 रोजी होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही तरी त्यानंतर किमान श्रीरामाचे दर्शन व्हावे, अशी प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. यासाठीच नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-अयोध्या मार्गावर फेब्रुवारी महिन्यात रेल्वेफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 फेब्रुवारी रोजी एक्स्प्रेस बेळगावमधून निघणार […]

नैर्त्रुत्य रेल्वेची बेळगावातून पुढील महिन्यात अयोध्या फेरी

17 फेब्रुवारीला रेल्वे बेळगावमधून निघणार
बेळगाव : अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवार दि. 22 रोजी होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही तरी त्यानंतर किमान श्रीरामाचे दर्शन व्हावे, अशी प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. यासाठीच नैर्त्रुत्य रेल्वेने बेळगाव-अयोध्या मार्गावर फेब्रुवारी महिन्यात रेल्वेफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 फेब्रुवारी रोजी एक्स्प्रेस बेळगावमधून निघणार आहे. तर परतीच्या प्रवासात अयोध्या येथून 20 रोजी एक्स्प्रेस बेळगावच्या दिशेने रवाना होईल. ही एक्स्प्रेस हुबळी, धारवाड, सिकंदराबादमार्गे अयोध्येला जाईल. एकूण 48 तासांचा हा प्रवास असणार आहे. नैर्त्रुत्य रेल्वेने अद्याप तिकीट बुकिंग सुरू केले नसले तरी येत्या चार दिवसांत तिकीट बुकिंग सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.