अॅक्सेलसेन, ताय त्झु यिंग वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजेते
वृत्तसंस्था/ बिजींग
चीनमधील हांगझोऊ येथे रविवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर फायनल्स स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसेन तर महिला एकेरीत तैवानची माजी टॉप सिडेड ताय त्झु यिंगने अजिंक्यपद पटकाविले.
विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे 2023 च्या वर्षअखेर आयोजिलेल्या या स्पर्धेत रविवारी पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 29 वर्षीय अॅक्सेलसेनने चीनच्या युक्वीचा 21-11, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना एकतर्फीच झाला. महिला एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात तैवानच्या चौथ्या मानांकित ताय त्झु यिंगने स्पेनच्या कॅरोलिना मॅरिनचा 12-21, 21-14, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.
या स्पर्धेत दक्षिण कोरियाच्या विश्वविजेत्या हेयुक आणि जेई यांनी पुरूष दुहेरीचे जेतेपद पटकाविताना चीनच्या लियांग वेकिंग आणि वेंगचँग यांचा 21-17, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. सदर स्पर्धेमध्ये चीनच्या चेन क्विंगचेन आणि जिया इफेन या जोडीने दक्षिण कोरियाच्या बाएक ना व ली सो ही यांचा 21-16, 21-16 असा फडशा पाडत महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. झेंग सिवेई आणि हुआंग याक्विंग यांनी मिश्र दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविताना चीनच्या डाँगपेंग व एनझी यांचा 21-11, 21-18 अशा गेम्समध्ये फडशा पाडला.
Home महत्वाची बातमी अॅक्सेलसेन, ताय त्झु यिंग वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजेते
अॅक्सेलसेन, ताय त्झु यिंग वर्ल्ड टूर फायनल्समध्ये विजेते
वृत्तसंस्था/ बिजींग चीनमधील हांगझोऊ येथे रविवारी झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर फायनल्स स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये डेन्मार्कचा ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसेन तर महिला एकेरीत तैवानची माजी टॉप सिडेड ताय त्झु यिंगने अजिंक्यपद पटकाविले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनतर्फे 2023 च्या वर्षअखेर आयोजिलेल्या या स्पर्धेत रविवारी पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 29 वर्षीय अॅक्सेलसेनने चीनच्या युक्वीचा 21-11, 21-12 अशा […]