विधानसौध परिसरात स्वीपतर्फे जागृती

बेळगाव : तालुका स्वीप समितीतर्फे मतदान जागृतीसाठी कंबर कसण्यात आली आहे. विविध गावांमध्ये उपक्रम राबवून जनमानसात मतदान जागृती केली जात आहे. मंगळवारी तारिहाळ आणि सुवर्णविधानसौध परिसरात आकाशामध्ये फुगे सोडून जनजागृती करण्यात आली. लोकशाही बळकट व्हावी व मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदान जागृतीचे काम हाती घेतले आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये रांगोळी, चित्रकला, बाईक रॅली, सायकल रॅली […]

विधानसौध परिसरात स्वीपतर्फे जागृती

बेळगाव : तालुका स्वीप समितीतर्फे मतदान जागृतीसाठी कंबर कसण्यात आली आहे. विविध गावांमध्ये उपक्रम राबवून जनमानसात मतदान जागृती केली जात आहे. मंगळवारी तारिहाळ आणि सुवर्णविधानसौध परिसरात आकाशामध्ये फुगे सोडून जनजागृती करण्यात आली. लोकशाही बळकट व्हावी व मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदान जागृतीचे काम हाती घेतले आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये रांगोळी, चित्रकला, बाईक रॅली, सायकल रॅली यासह इतर उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. यावेळी तालुका स्वीप समितीचे अधिकारी, आशा कार्यकर्त्या यांच्यासह इतर खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.