भारतीय तटरक्षक दलातर्फे जागतिक योग दिनानिमित्त योगाविषयी जागृती

वास्को : भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय व तटरक्षक दल युनिटतर्फे जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिरे व नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ब्रह्माकुमारी वास्को व एनएएडी योग केंद्र पणजी यांच्या सहकार्याने तटरक्षक दलाचे जवान व त्यांच्या कुटुंबियांसाठी योग शिबिर आयोजित केले.गोव्यातील सर्व तटरक्षक दलाच्या युनिटद्वारे कर्मचाऱ्यांसाठी योग सत्रे घेण्यात आली. तटरक्षक दलाच्या जहाजावरील […]

भारतीय तटरक्षक दलातर्फे जागतिक योग दिनानिमित्त योगाविषयी जागृती

वास्को : भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय व तटरक्षक दल युनिटतर्फे जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिरे व नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ब्रह्माकुमारी वास्को व एनएएडी योग केंद्र पणजी यांच्या सहकार्याने तटरक्षक दलाचे जवान व त्यांच्या कुटुंबियांसाठी योग शिबिर आयोजित केले.गोव्यातील सर्व तटरक्षक दलाच्या युनिटद्वारे कर्मचाऱ्यांसाठी योग सत्रे घेण्यात आली. तटरक्षक दलाच्या जहाजावरील जवानानीही समुद्रात असलेल्या जहाजांवर योगासने केली. दहाव्या जागतिक योग दिनाचा ‘स्वत:साठी आणि समाजासाठी योग’ हा विषय होता. कोलवा, बेतुल,वेलसांव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधण्यात आला. दि. 7 ते 20 जूनपर्यंत बोगमाळो येथील समुद्र किनाऱ्यावर मच्छीमार बांधवांशी  संवाद कार्यक्रमांसह सुरक्षित मासेमारी पद्धती व विविध सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले.