‘ब्लडी इश्क’मध्ये अविका गौर
ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट
ओटीटीवर सध्या हॉररपट आणि सीरिजवरून प्रेक्षकांची रुची वाढली आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:च्या हॉररपटांमुळे ओळख निर्माण करणारे भट्ट ब्रदर्स पुन्हा एकत्र आले आहेत. विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनात निर्मित ‘ब्लडी इश्क’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अविका गौर आणि वर्धन पुरी यांची यात मुख्य भूमिका आहे.
अविका गौर ही टीव्हीवर ‘बालिका वधू’ होत चर्चेत राहिली होती. तेव्हा तिचे वय 11 वर्षे होते. भट्ट कॅम्पसाब्sात अविकाचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी तिने ‘1920 : हॉरर्स ऑफ द हार्ट’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
विक्रम भट्ट यांचे दिग्दर्शन लाभलेल्या ब्लडी इश्क चित्रपटाची कहाणी महेश भट्ट यांनी लिहिली आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. अविका गौर आणि वर्धन पुरी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 26 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Home महत्वाची बातमी ‘ब्लडी इश्क’मध्ये अविका गौर
‘ब्लडी इश्क’मध्ये अविका गौर
ओटीटीवर प्रदर्शित होणार चित्रपट ओटीटीवर सध्या हॉररपट आणि सीरिजवरून प्रेक्षकांची रुची वाढली आहे. बॉलिवूडमध्ये स्वत:च्या हॉररपटांमुळे ओळख निर्माण करणारे भट्ट ब्रदर्स पुन्हा एकत्र आले आहेत. विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनात निर्मित ‘ब्लडी इश्क’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अविका गौर आणि वर्धन पुरी यांची यात मुख्य भूमिका आहे. अविका गौर ही टीव्हीवर ‘बालिका वधू’ होत […]
