केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन

उत्तराखंडमध्ये हाहाकार सुरूच : नजिकच्या राज्यांमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, देहराडून देशभरात सुरू असलेल्या पावसादरम्यान रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन झाले. पहाटे 5 वाजता मंदिरामागील टेकडीवर असलेल्या गांधी सरोवरावर हिमाचा मोठा भाग कोसळला. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. याआधी शनिवारी हरिद्वार, उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 10-12 वाहने वाहून गेली […]

केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन

उत्तराखंडमध्ये हाहाकार सुरूच : नजिकच्या राज्यांमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, देहराडून
देशभरात सुरू असलेल्या पावसादरम्यान रविवारी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन झाले. पहाटे 5 वाजता मंदिरामागील टेकडीवर असलेल्या गांधी सरोवरावर हिमाचा मोठा भाग कोसळला. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. याआधी शनिवारी हरिद्वार, उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 10-12 वाहने वाहून गेली होती. दुसरीकडे, झारखंडमधील गिरिडीह जिह्यात पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला.
भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये 2 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, अऊणाचल प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेघालय, अऊणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 30 जून ते 3 जुलै दरम्यान 64.5 ते 204.4 मिमी पाऊस पडण्याची शक्मयता आहे. सोमवारपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सूनने उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये प्रवेश केला असून आता फक्त पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानचा काही भाग उरला आहे. साधारणपणे 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो. मात्र, गेल्या चार दिवसात मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे.
हिमाचल, आसाममध्येही पूरस्थिती
हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कांगडा, कुल्लू आणि किन्नौर जिह्यातील तीन रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचवेळी, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दिब्रुगडमध्ये सीआरपीएफ पॅम्प, पोलीस पॅम्पसह अनेक घरे जलमय झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे रस्ते जलमय झाले असून वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे.
दिल्लीत दोन दिवसांत 11 जणांचा मृत्यू
दिल्लीत गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जून रोजीही 6 मृतदेह सापडले होते. यामध्ये चार मुले, एक तऊण आणि एका वृद्धाचा समावेश आहे. त्याचवेळी एम्सच्या पार्किंगमध्ये पाणी साचले होते. दुसरीकडे, अवघ्या तीन दिवसांच्या पावसामुळे हरिद्वारमध्ये गंगा नदीला उधाण आले होते. त्यामुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात दहा-बारा गाड्या वाहून गेल्या. सुदैवाने या गाड्यांमध्ये कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.