ऑस्ट्रेलियाची सोफी मॉलिन्यूक्स जखमी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू सोफी मॉलिन्यूक्सच्या बरगडीचे हाड मोडल्याने ती आगामी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता जवळपास दूरावली आहे. या मालिकेसाठी मॉलिन्यूक्सच्या सहभागाबाबत शाशंकता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात एका सामन्यात फलंदाजी करताना उसळता चेंडू पाठीच्या मध्य भागावर आदळल्याने बरगडीचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकिय तपासात आढळून आले. या दुखापतीमुळे मॉलिन्यूक्सला या सामन्यात आपले शतक नोंदविता आले नाही. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाची आणखी एक महिला अष्टपैलू ग्रेस हॅरिस ही पूर्णपणे तंदूरुस्त नसल्याने ती आगामी मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. 30 वर्षीय अष्टपैलू ग्रेस हॅरिसला स्नायू दुखापत जाणवली होती. आगामी होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी 26 वर्षीय मॉलिन्यूक्सला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलियाची सोफी मॉलिन्यूक्स जखमी
ऑस्ट्रेलियाची सोफी मॉलिन्यूक्स जखमी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू सोफी मॉलिन्यूक्सच्या बरगडीचे हाड मोडल्याने ती आगामी होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता जवळपास दूरावली आहे. या मालिकेसाठी मॉलिन्यूक्सच्या सहभागाबाबत शाशंकता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात एका सामन्यात फलंदाजी करताना उसळता चेंडू पाठीच्या मध्य भागावर आदळल्याने बरगडीचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकिय तपासात आढळून आले. या दुखापतीमुळे […]
