ऑस्ट्रेलियाचा मिनॉर अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ अॅकापुल्को (मेक्सिको)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मेक्सिकन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी विजेत्या अॅलेक्स डी मिनॉरने एकेरीची अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात तृतीय मानांकित डी मिनॉरने पहिला सेट 6-3 असा जिंकला. त्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी ड्रेपरने दुसरा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. दरम्यान तिसऱ्या सेटमध्ये ड्रेपर 4-0 असा आघाडीवर असताना त्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याने हा सामना अर्धवट सोडल्याने मिनॉरला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. दुसऱ्या एका उपांत्य सामन्यात कास्पर रुडने द्वितीय मानांकित होल्गेर रुनेचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मिनॉर आणि रुड यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. नॉर्वेचा 25 वर्षीय रुडने आतापर्यंत 10 स्पर्धा जिंकल्या आहेत. एटीपीच्या मानांकनात रुने सातव्या स्थानावर आहे.
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलियाचा मिनॉर अंतिम फेरीत
ऑस्ट्रेलियाचा मिनॉर अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ अॅकापुल्को (मेक्सिको) एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मेक्सिकन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा माजी विजेत्या अॅलेक्स डी मिनॉरने एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात तृतीय मानांकित डी मिनॉरने पहिला सेट 6-3 असा जिंकला. त्यानंतर त्याचा प्रतिस्पर्धी ड्रेपरने दुसरा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. दरम्यान तिसऱ्या सेटमध्ये ड्रेपर 4-0 असा […]
