ऑस्ट्रेलियाचा मिनॉर विजेता
वृत्तसंस्था/ अॅकापुल्को (मेक्सिको)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या अॅकापुल्को मेक्सिकन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या तृतीय मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने एकेरीचे जेतेपद मिळविताना नॉर्वेच्या कास्पर रूडचा पराभव केला. या स्पर्धेतील मिनॉरचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. या जेतेपदामुळे आता सोमवारी घोषित होणाऱ्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत मिनॉर पहिल्या 10 खेळाडूंमध्ये राहिल.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 25 वर्षीय मिनॉरने नॉर्वेच्या कास्पर रूडचे आव्हान 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. एटीपी टूरवरील मिनॉरचे हे आठवे जेतेपद असून त्यापैकी त्याने सात विजेतीपदे हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत जिंकली आहेत.
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलियाचा मिनॉर विजेता
ऑस्ट्रेलियाचा मिनॉर विजेता
वृत्तसंस्था/ अॅकापुल्को (मेक्सिको) एटीपी टूरवरील येथे झालेल्या अॅकापुल्को मेक्सिकन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या तृतीय मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने एकेरीचे जेतेपद मिळविताना नॉर्वेच्या कास्पर रूडचा पराभव केला. या स्पर्धेतील मिनॉरचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. या जेतेपदामुळे आता सोमवारी घोषित होणाऱ्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत मिनॉर पहिल्या 10 खेळाडूंमध्ये राहिल. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात 25 […]