ऑस्ट्रेलियाचा 4 गड्यांनी विजय नामिबीयाचा पराभव
कॅलम व्हिडलेर सामनावीर
वृत्तसंस्था/ किंबर्ली
19 वर्षाखालील वयोगटाच्या क गटातील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुबळ्या नामिबीयाचा 181 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅलम व्हिडलेरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून नामिबीयाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबीयाचा डाव 33.1 षटकात 91 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19.5 षटकात 6 बाद 95 धावा जमवित हा सामना 4 गड्यांनी जिंकला. या स्पर्धेतील हा नववा सामना होता.
नामिबीयाच्या डावात व्हॅन व्हेरेनने 47 चेंडूत 5 चौकारांसह 29, कर्णधार अॅलेक्सझांडेर व्होलशेंकने 45 चेंडूत 1 षटकार, 1 चौकारासह 21 तर बॅडेनहॉर्स्टने 1 चौकारासह नाबाद 11 धावा केल्या. नामिबीयाला 14 धावा अवांतर रुपात मिळाल्या. नामिबीयाच्या डावात 1 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे व्हिडलेरने 17 धावात 4, स्ट्रेकरने 16 धावात 3, बियर्डमनने 15 धावात 2 तर मॅकमिलनने 24 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाने 19.5 षटकात 6 बाद 95 धावा जमवित हा सामना 4 गड्यांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये डिक्सनने 24 चेंडूत 30 चौकारांसह 24, वेल्बगेनने 43 चेंडूत 4 चौकारांसह 39, मॅकमिलनने 26 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 9 चौकार नोंदविले गेले. 19.5 षटकात ऑस्ट्रेलियाने आपला विजय आरामात नोंदविला. कर्णधार वेबगेनने 43 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा जमविल्या. तर मॅकमिलनने 26 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा केल्या. ऑस्टेलियाच्या डावात 11 चौकार नोंदविले गेले. नामिबीयातर्फे ब्रेसिलने 28 धावात 3 तर बॅडेनहॉर्स्टने 29 धावात 2 तसेच व्हॅनवेकने 6 धावात 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 11 चौकार नोंदविले गेले
संक्षिप्त धावफलक – नामिबीया 33.1 षटकात सर्व बाद 91 (व्हॅन व्ह्युरेन 29, व्होलशेंक 21, अवांतर 14, व्हिडलेर 4-17, स्ट्रेकर 3-16, बियर्डमन 2-15, मॅकमिलन 1-24), ऑस्टेलिया 19.5 षटकात 6 बाद 95 (डिगसन 16, वेबगेन नाबाद 39, मॅकमिलन 16, ब्रेसिल 3-28, बॅडेनहॉर्स्ट 2-29, व्हॅनवेक 1-6).
Home महत्वाची बातमी ऑस्ट्रेलियाचा 4 गड्यांनी विजय नामिबीयाचा पराभव
ऑस्ट्रेलियाचा 4 गड्यांनी विजय नामिबीयाचा पराभव
कॅलम व्हिडलेर सामनावीर वृत्तसंस्था/ किंबर्ली 19 वर्षाखालील वयोगटाच्या क गटातील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुबळ्या नामिबीयाचा 181 चेंडू बाकी ठेऊन 4 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅलम व्हिडलेरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून नामिबीयाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबीयाचा डाव 33.1 षटकात 91 धावात आटोपला. […]
