वृद्धाचे शुभमंगल की अमंगल?
90 व्या वर्षी 40 वर्षीय महिलेशी लग्न : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाकडून फिर्याद
बेळगाव : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला वृद्धापकाळात मदत करण्याच्या बहाण्याने शहापूर येथील एका महिलेने त्याच्याशी लग्न केले आहे. 90 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याबरोबर 40 वर्षीय महिलेने लग्नगाठ बांधली असून त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी सध्या संबंधित महिलेविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सरस्वतीनगर, पाईपलाईन रोड, गणेशपूर परिसरात एक 90 वर्षीय निवृत्त लेफ्टनंट कर्नल जगत्नरेन सिंग राहतात. वयोमानामुळे त्यांना नीट चालताही येत नाही. त्यामुळे ते घरीच राहतात. हीच संधी साधून कोरे गल्ली, शहापूर येथील एका महिलेने त्या निवृत्त अधिकाऱ्याचे घर गाठून त्यांच्याशी लग्न केल्याचे सामोरे आले आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर येथील पूनम (वय 40) या महिलेविरुद्ध भादंवि 448, 420, 506 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. लग्न करण्यामागचा उद्देश वेगळा असल्याची चर्चा सुरू आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला पाच मुले आहेत. यापैकी कोणालाही कल्पना न देता 20 एप्रिल 2024 रोजी उपनोंदणी कार्यालयात लग्नाची नोंद करण्यात आली आहे. त्या अधिकाऱ्याच्या पेन्शनवर व मालमत्तेवर डोळा ठेवून संबंधित महिलेने मदतीच्या नावाखाली निवृत्त अधिकाऱ्याशी लग्न केल्याचा आरोप केला जात आहे. 3 मे रोजी निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाला धमकावण्याचाही प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी वृद्धाचे शुभमंगल की अमंगल?
वृद्धाचे शुभमंगल की अमंगल?
90 व्या वर्षी 40 वर्षीय महिलेशी लग्न : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाकडून फिर्याद बेळगाव : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला वृद्धापकाळात मदत करण्याच्या बहाण्याने शहापूर येथील एका महिलेने त्याच्याशी लग्न केले आहे. 90 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याबरोबर 40 वर्षीय महिलेने लग्नगाठ बांधली असून त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी सध्या संबंधित महिलेविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सरस्वतीनगर, पाईपलाईन रोड, गणेशपूर […]