महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे लक्ष

प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानंतरच निर्णय बेळगाव : महापौर, उपमहापौर निवडणूक कधी होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. प्रादेशिक आयुक्त सुटीवर गेल्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीबाबत कोणताच आदेश आला नाही, असे महापालिकेतील कौन्सिल विभागाने सांगितले आहे. मात्र बुधवारी प्रादेशिक आयुक्त पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे लवकरच आदेश देणार का? हे पहावे लागणार आहे. फेब्रुवारी 5 रोजी महापौर, […]

महापौर-उपमहापौर निवडणुकीकडे लक्ष

प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानंतरच निर्णय
बेळगाव : महापौर, उपमहापौर निवडणूक कधी होणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे. प्रादेशिक आयुक्त सुटीवर गेल्यामुळे त्यांच्याकडून या निवडणुकीबाबत कोणताच आदेश आला नाही, असे महापालिकेतील कौन्सिल विभागाने सांगितले आहे. मात्र बुधवारी प्रादेशिक आयुक्त पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे लवकरच आदेश देणार का? हे पहावे लागणार आहे. फेब्रुवारी 5 रोजी महापौर, उपमहापौर यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यानंतर नव्या महापौर व उपमहापौरांची निवडणूक होणार आहे. यावेळी महापौरपद महिला अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर उपमहापौर सर्वसामान्य पुरुषासाठी राखीव आहे. सत्ताधारी असलेल्या भाजपने यासाठी जोरदार तयारी सुरू केली असली तरी प्रादेशिक आयुक्तांकडून आदेश आल्यानंतरच निवडणूक होणार आहे. सोमवार दि. 5 फेब्रुवारी रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे प्रशासकीय नेमणूक करावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक काही दिवसांतच जाहीर होणार आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीला अडथळा निर्माण होतो का? हे देखील पहावे लागणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत याबाबतचा आदेश प्रादेशिक आयुक्तांकडून येईल, अशी अपेक्षा महापालिकेतील कौन्सिल विभागाने व्यक्त केली आहे.