निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
तालुका म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. कन्नडसाठी जो दबाव सुरू आहे, त्याविरोधात हे निवेदन दिले जाणार असून मोठ्या संख्यने म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. जाणूनबुजून मराठी भाषिकांवर कन्नडची सक्ती केली जात आहे. लोकशाही असताना अशाप्रकारे एखाद्या भाषेसाठी अट्टाहास करणे चुकीचे आहे. सीमाभागामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या भाषेतच कागदपत्रांसह इतर सुविधा कायद्यानुसारच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र कायदा पायदळी तुडवून कन्नडची सक्ती केली जात आहे. त्याला विरोध म्हणून मंगळवारी निवेदन देण्यात येणार आहे. तेव्हा सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीने केले आहे.
Home महत्वाची बातमी निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा
तालुका म. ए. समितीचे आवाहन बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. कन्नडसाठी जो दबाव सुरू आहे, त्याविरोधात हे निवेदन दिले जाणार असून मोठ्या संख्यने म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांना […]
