एटीएफ हवाई इंधन झाले स्वस्त

नव्या वर्षात हवाई कंपन्यांना दिलासा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हवाई कंपन्यांसाठी खर्चात 50 टक्के इतका हिस्सा उचलणाऱ्या एटीएफ इंधनाच्या किमती नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कमी करण्यात आल्याने कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. नव्या वर्षात पहिल्याच दिवशी विमान प्रवास करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. विमानांकरीता लागणाऱ्या एटीएफ इंधनाच्या किमती 1 जानेवारीपासून कमी करण्यात आल्या आहेत. विमानांकरीता खर्चाच्या हिशोबाने […]

एटीएफ हवाई इंधन झाले स्वस्त

नव्या वर्षात हवाई कंपन्यांना दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई कंपन्यांसाठी खर्चात 50 टक्के इतका हिस्सा उचलणाऱ्या एटीएफ इंधनाच्या किमती नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कमी करण्यात आल्याने कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्या वर्षात पहिल्याच दिवशी विमान प्रवास करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. विमानांकरीता लागणाऱ्या एटीएफ इंधनाच्या किमती 1 जानेवारीपासून कमी करण्यात आल्या आहेत. विमानांकरीता खर्चाच्या हिशोबाने पाहता इंधनाचा खर्च 50 टक्के असतो. आगामी काळात विमान प्रवाशांचा खिसा हलका होण्याची शक्यता सांगितली जात आहे. विमानांकरीता लागणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्यूल अर्थात एटीएफ इंधनाच्या किंमती 1.06 लाख रुपये प्रति किलोलिटर वरुन आता कमी होऊन 1.01 लाख रुपये प्रति किलोलिटर इतक्या झाल्या आहेत.
कंपन्यांना दिलासा
सदरच्या किंमती कमी करण्यात आल्याने हवाई क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागावर शेअरबाजारात सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. इंधन दर कमी केल्याचा फायदा इंडिगो, स्पाइसजेट अशा कंपन्यांना होणार आहे. याआधी डिसेंबर 2023 मध्येही एटीएफच्या किंमती 4.6 टक्के इतक्या कमी करण्यात आल्या होत्या. दिल्लीत एटीएफचा दर 1 लाख 6 हजार 155 रुपये प्रति किलोलिटर इतका झाला आहे.