दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 285 कोटींची मदत

40 हजार रूग्णांचे वाचले प्राण : कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांची माहिती : गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन कोल्हापूर प्रतिनिधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून दोन वर्षामध्ये गरीब व गरजू रूग्णांसाठी 285 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत दिली आहे. या योजनेअंतर्गत 40 हजार रूग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी […]

दोन वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 285 कोटींची मदत

40 हजार रूग्णांचे वाचले प्राण : कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांची माहिती : गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून दोन वर्षामध्ये गरीब व गरजू रूग्णांसाठी 285 कोटी रूपयांची वैद्यकीय मदत दिली आहे. या योजनेअंतर्गत 40 हजार रूग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
‘ना वशिला, ना ओळखीची मध्यस्थी’प्रमाणे योजनेअंतर्गत अर्थसहाय्य व हॉस्पिटल अंगीकृत करण्याची प्रकीया मोफत आहे. कोणताही मध्यस्थी, व्यक्ती किंवा खासगी संस्थेसोबत अर्ज भरण्यासाठी कोणतीही शुल्क देवू नये. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षप्रमुख प्रशांत साळूंखे, सहाय्यक सागर झाडे, डॉ. उदय भोसले, सुरज जम्मा, ओम आपूसकर, जिल्हा प्रमुख नितीन पाटील, विनायक जाधव, निखिल निंबाळकर उपस्थित होते.
चिवटे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली योजनेसाठी भरीव निधी दिला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सहकार्य मिळत आहे. योजनेच्या माध्यमातून 20 दुर्धर आजारांसाठी लाखोंची मदत केली जाते. आत्तापर्यंत 285 कोटी रूपयांचा निधी दिला असुन 300 कोटी रूपयांचा टप्पा पार करणार आहे. जास्तीजास्त रूग्णांना लाभ मिळवून देणे हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेसाठी कोल्हापूर शहरातील 50 हॉस्पिटल समाविष्ट केली असुन s आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची प्रकीया ऑनलाईन केली असुन मुंबईला हेलपाटे मारण्याची गरज नाही. अर्ज भरल्यानंतर 72 तासात रूग्णाला निधीची सहाय्यता केली जाते. योजनेमध्ये कुस्तीपट्टूसाठी लिंगामेन्ट इंज्यूरिया सर्जरीचा समावेश केला आहे. आरोग्य वारीच्या माध्यमातून 117 वारकऱ्यांचे प्राण वाचले. यासाठी देहू व आळंदी ते पंढरपुर या वारीसोबत 22 डॉक्टरांची टीम कार्यरत होती. योजना पुर्णपणे पारदर्शक असुन गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिवटे यांनी केले.