विधानसभा अधिवेशन 2 फेब्रुवारीपासून

राज्यपालांकडून अधिसूचना जारी : सहा दिवसांचे अधिवेशन पणजी : गोवा विधानसभेचे एकूण 6 दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून त्याची अधिसूचना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी जारी केली आहे. त्यात राज्यपालांचे अभिभाषण, आर्थिक सर्वेक्षण अहवाल, राज्याचा अर्थसंकल्प तसेच लेखानुदान असे कामकाज आहे. त्याशिवाय प्रश्नोत्तरे, शून्य तास, लक्षवेधी सूचना, सरकारी […]

विधानसभा अधिवेशन 2 फेब्रुवारीपासून

राज्यपालांकडून अधिसूचना जारी : सहा दिवसांचे अधिवेशन
पणजी : गोवा विधानसभेचे एकूण 6 दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणार असून त्याची अधिसूचना राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी जारी केली आहे. त्यात राज्यपालांचे अभिभाषण, आर्थिक सर्वेक्षण अहवाल, राज्याचा अर्थसंकल्प तसेच लेखानुदान असे कामकाज आहे. त्याशिवाय प्रश्नोत्तरे, शून्य तास, लक्षवेधी सूचना, सरकारी व खासगी विधेयके यांचाही कामकाजात समावेश आहे. वर्ष 2024 मधील हे पहिले विधानसभा अधिवेशन असल्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणाने त्याची सुऊवात होणार आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस शुक्रवार असून त्यानंतर 3 व 4 फेब्रुवारी रोजी शनिवार – रविवार असल्याने सुट्टी आहे. पुन्हा 5 फेब्रुवारी सोमवार ते 9 फेब्रुवारी शुक्रवारपर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. एप्रिल – मे महिन्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्यामुळे आणि त्याची आचारसंहिता मार्च महिन्यातच लागू करण्यात येणार असल्याने तत्पूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी हे अधिवेशन फेब्रुवारीत आखण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी एक महिन्याचा कालावधी बाकी असून विरोधी, सत्ताधारी आमदारांना प्रश्न विचारण्यासाठी भरपूर वेळ आहे.