आसाम सरकार देशात सर्वात भ्रष्ट

वृत्तसंस्था /शिवसागर काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पाचव्या दिवशी राहुल गांधी नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाले आहेत. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. भाजप आणि संघ देशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अन्याय करत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचे लक्ष्य प्रत्येक धर्म, प्रत्येक जातीच्या लोकांना एकजूट करण्यासोबत या अन्यायाच्या विरोधात लढणे देखील असल्याचे राहुल […]

आसाम सरकार देशात सर्वात भ्रष्ट

वृत्तसंस्था /शिवसागर
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पाचव्या दिवशी राहुल गांधी नागालँडमधून आसाममध्ये दाखल झाले आहेत. आसामच्या शिवसागर जिल्ह्यात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. भाजप आणि संघ देशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अन्याय करत आहे. भारत जोडो न्याय यात्रेचे लक्ष्य प्रत्येक धर्म, प्रत्येक जातीच्या लोकांना एकजूट करण्यासोबत या अन्यायाच्या विरोधात लढणे देखील असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. आसाममध्ये देशातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. भाजप देशात द्वेष फैलावण्यासोबत जनतेचा पैसा लुटत आहे. आम्ही भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसामचा मुद्दा उपस्थित करणार आहोत. मणिपूरमध्ये गृहयुद्धासारखी स्थिती आहे. पंतप्रधान मोदी आजवर तेथे गेले नाहीत. नागलँडमध्ये पंतप्रधानांनी मोठमोठी आश्वासने दिली होती. आता तेथील लोक या आश्वासनांचे काय झाले अशी विचारणा करत आहेत. असाच प्रकार आसाममध्ये देखील घडत असल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. आसाममध्ये 18-25 जानेवारीपर्यंत न्याय यात्रा राहणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रा यशस्वी ठरू नये असा पूर्ण प्रयत्न आसाम सरकार करणार आहे. परंतु युवा आणि महिलांसोबत आसाममधील सर्व घटक राहुल गांधी यांचे विचार ऐकतील असा विश्वास असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
मला न्याय कधी मिळणार?
युवा काँग्रेसच्या माजी नेत्या अंगकिता दत्ता यांनी गुरुवारी राहुल गांधी यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. अंगकिता यांनी काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी अद्याप मला न्याय मिळालेला नाही असे म्हणत अंगकिता यांनी शिवसागर जिल्ह्यातील अमगुरी येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. काँग्रेसने अंगकिता दत्ता यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी केली आहे.