कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ता डांबरीकरणाला प्रारंभ

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ते अनेक वर्षांपासून खराब झाले होते. याची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. गुरुवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली. यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्त्यांची दुर्दशा झाली होती. यामुळे अपघातांची मालिका सुरू होती. […]

कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ता डांबरीकरणाला प्रारंभ

बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्ते अनेक वर्षांपासून खराब झाले होते. याची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. गुरुवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कामाला सुरुवात झाली. यामुळे रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डमधील रस्त्यांची दुर्दशा झाली होती. यामुळे अपघातांची मालिका सुरू होती. अनेकवेळा तक्रारी करून देखील बोर्ड प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. जानेवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण बैठकीत रस्ता डांबरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. निधी मंजूर करण्यात आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डमधील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. गुरुवारी कॅन्टोन्मेंट बोर्डचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर, व्यवस्थापक सतीश मन्नोळकर व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. इंडिपेंडेंट रोड, चॅपेल रोड, चर्च स्ट्रीट, साऊथ टेलिग्राम रोड यासह इतर रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.