अश्विनचे अग्रस्थान कायम, बुमराहची प्रगती

आयसीसी कसोटी मानांकन : फलंदाजांत कोहली टॉप टेनमध्ये एकमेव भारतीय वृत्तसंस्था/ दुबई आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी गोलंदाजांच्या मानांकनातील अग्रस्थान कायम राखले असून त्याचाच संघसहकारी जसप्रित बुमराहने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या कसोटीत अश्विनने 6 बळी मिळविले. त्याचे […]

अश्विनचे अग्रस्थान कायम, बुमराहची प्रगती

आयसीसी कसोटी मानांकन : फलंदाजांत कोहली टॉप टेनमध्ये एकमेव भारतीय
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनात भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कसोटी गोलंदाजांच्या मानांकनातील अग्रस्थान कायम राखले असून त्याचाच संघसहकारी जसप्रित बुमराहने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
हैदराबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्या कसोटीत अश्विनने 6 बळी मिळविले. त्याचे 853 रेटिंग गुण झाले आहेत. याच कसोटीत बुमराहनेही 6 बळी मिळविल्याने एका स्थानाची प्रगती करीत चौथ्या स्थानावर आला आहे. टॉप टेनमध्ये स्थान मिळविणारा जडेजा हा तिसरा भारतीय आहे. तो सहाव्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत मात्र जडेजा अव्वल स्थानावर आहे. मात्र इंग्लंडच्या जो रूटने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली तर तो त्याच्या स्थानाला आव्हान देऊ शकतो. रूट मुख्यता फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण हैदराबाद कसोटीत त्याने 5 बळी टिपण्याची कामगिरी केली. दुसऱ्या डावात तर त्याने इंग्लंडसाठी गोलंदाजीची सुरुवातही केली होती. या कामगिरीमुळे कसोटी अष्टपैलूंमध्ये त्याचे स्थान वधारले असून तो आता चौथ्या स्थानावर विसावला आहे. रूट हा अश्विन व शकीब अल हसन यांच्या मागे आहे तर अक्षर पटेलची एका स्थानाने घसरण झाल्याने तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
कसोटी फलंदाजांमध्ये विराट कोहली सहाव्या स्थानावर पोहोचला असून टॉप टेनमध्ये स्थान मिळविणारा तो भारताचा एकमेव फलंदाज आहे. हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात 196 धावांची शानदार खेळी करणाऱ्या ऑली पोपने एकमद 20 स्थानांची झेप घेत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचाच सहकारी बेन डकेटच्या मानांकनातही पाच स्थानांची सुधारणा झाली असून तो आता 22 व्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने दोन स्थानांची प्रगती केली असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगले प्रदर्शन केल्यानंतर विंडीजच्या जलद गोलंदाजांच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. दोन स्थानांची बढती मिळवित केमार रॉक 17 व्या, अल्झारी जोसेफ 33 व्या (चार स्थानांची प्रगती), शमार जोसेफ 50 व्या (42 स्थानांची प्रगती) पोहोचले आहेत.