अश्विन, बेअरस्टो धरमशालात खेळतील 100 वी कसोटी

वृत्तसंस्था/ धरमशाला भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो गुऊवारी येथे मैदानात उतरतील तेव्हा दोन्ही खेळाडू कसोटी क्रिकेटमधील त्यांचा 100 वा सामना खेळतील आणि ते चौथ्यांदा एकत्र खेळताना दिसणार आहेत. असा पहिला प्रसंग इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथरटन आणि अॅलेक स्टीवर्ट यांच्याबाबतीत घडला होता. 2000 मध्ये ओल्ड ट्रॅफर्डवर वेस्ट इंडिजविऊद्ध त्यांनी हा ऐतिहासिक […]

अश्विन, बेअरस्टो धरमशालात खेळतील 100 वी कसोटी

वृत्तसंस्था/ धरमशाला
भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो गुऊवारी येथे मैदानात उतरतील तेव्हा दोन्ही खेळाडू कसोटी क्रिकेटमधील त्यांचा 100 वा सामना खेळतील आणि ते चौथ्यांदा एकत्र खेळताना दिसणार आहेत. असा पहिला प्रसंग इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथरटन आणि अॅलेक स्टीवर्ट यांच्याबाबतीत घडला होता. 2000 मध्ये ओल्ड ट्रॅफर्डवर वेस्ट इंडिजविऊद्ध त्यांनी हा ऐतिहासिक टप्पा गाठला होता.
दुसऱ्या घटनेत तीन खेळाडूंचा समावेश होता. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे जॅक कॅलिस, शॉन पोलॉक आणि न्यूझीलंडचा स्टीफन फ्लेमिंग हे त्यांची 100 वी कसोटी खेळली होते. 2013 साली पर्थ येथे झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेतील सामन्यात अॅलिस्टर कूक आणि मायकेल क्लार्क यांच्याबाबतीत तिसरी अशी घटना घडली होती.
गुऊवारपासून येथे सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत अश्विन आणि बेअरस्टो आपापल्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. विरोधी संघांतील दोन खेळाडू एकाच सामन्यात त्यांची 100 वी कसोटी खेळत असताना पाहायला मिळण्याचा हा दुसरा प्रसंग असेल. भारत-इंग्लंड सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या एक दिवसाने न्यूझीलंडचा कर्णधार टिम साऊदी आणि माजी कर्णधार केन विल्यमसन हे ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या सामन्यादरम्यान त्यांची 100 वी कसोटी एकत्र खेळताना दिसणार आहेत.
अश्विन नुकताच अनिल कुंबळेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा ओलांडणारा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याने 2011 मध्ये कसोटीत पदार्पण केले होते आणि 13 वर्षांच्या प्रवासात त्याचा आलेख खालच्या दिशेपेक्षा वरच्या दिशेने जास्त झेपावलेला आहे. 34 वर्षीय बेअरस्टोने 2012 मध्ये पदार्पण केले हेते आणि 100 वी कसोटी खेळणारा तो 17 वा इंग्लिश खेळाडू ठरेल. सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारताने आधीच 3-1 अशी निर्णायक आघाडी घेतलेली आहे.