अष्ट विनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांचा समूह
Maharashtra Tourism : अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील गणपतीच्या आठ पवित्र मंदिरांचा समूह. ही मंदिरे गणपतीच्या आठ स्वयंभू म्हणजेच स्वतःहून प्रकट झालेल्या मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या आठ ठिकाणांना भेट देण्याने भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आठ प्रमुख गणपती मंदिरांचा समूह, ज्यांना विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ही मंदिरे पुणे, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये पसरलेली आहे आणि प्रत्येक मंदिरातील गणेशमूर्ती स्वयंभू मानली जाते. या मंदिरांना भेट देण्याची तीर्थयात्रा “अष्टविनायक यात्रा” म्हणून ओळखली जाते, जी सहसा दोन दिवसांत पूर्ण होते. यात्रेची सुरुवात आणि समारोप मोरगावच्या मयूरेश्वर मंदिरापासून होतो, अशी परंपरा आहे.
ALSO READ: ज्ञान व बुद्धीचा अधिपती मोरगावचा मोरेश्वर, महादेवांचा नंदी इथं मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर
अष्टविनायक मंदिरांची माहिती-
मोरेश्वर मोरगाव, पुणे
हे अष्टविनायकातील पहिले मंदिर आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून, तीन डोळ्यांसह हिरे जडलेली आहे. मंदिर कऱ्हा नदीच्या तीरावर आहे आणि बहामनी कालखंडात बांधले गेले. गणपतीला मयूर (मोर) वाहन असल्याने याला मयूरेश्वर म्हणतात.
ALSO READ: सिद्धी, शक्ती आणि यश देणारा सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक
सिद्धिविनायक सिद्धटेक, अहमदनगर
भीमा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर दुसऱ्या क्रमांकाचे आहे. मूर्ती उजव्या सोंडेची आहे, जी अष्टविनायकांमध्ये एकमेव आहे. अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. भगवान विष्णूंनी येथे सिद्धी प्राप्त केल्याची मान्यता आहे.
ALSO READ: भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव
बल्लालेश्वर पाली, रायगड
हे मंदिर गणपतीच्या भक्त बल्लाल यांच्या नावावर आहे. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मंदिर अंबा नदी आणि सरसगड किल्ल्याजवळ आहे. बल्लाल यांना गणेशाने येथे दर्शन दिल्याची आख्यायिका आहे.
ALSO READ: वरदान देणारा करुणामय देव श्री वरदविनायक, महड
वरदविनायक महड, रायगड
उजव्या सोंडेची मूर्ती असलेले हे मंदिर चौथ्या क्रमांकाचे आहे. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून याला “वरदविनायक” म्हणतात.
ALSO READ: चिंता हरून शांती देणारा श्री चिंतामणी, थेऊर येथील बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये सुंदर हिरे जडलेले
चिंतामणी थेऊर, पुणे
कदंब वृक्षाखाली वसलेले हे मंदिर पाचव्या क्रमांकाचे आहे. भक्तांची चिंता दूर करणारा हा गणपती आहे. चिंचवडच्या मोरया गोसावी यांनी येथे तप केले होते. मंदिराचा सभामंडप पेशव्यांनी बांधला.
ALSO READ: मातृभक्त आणि संयमाचा आदर्श श्री गिरीजात्मज, डोंगरावर असलेलं अष्टविनायकातील एकमेव मंदिर लेण्याद्री
गिरिजात्मज लेण्याद्री, पुणे
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, बौद्धकालीन गुफांमध्ये हे मंदिर आहे. मूर्ती पाषाणात कोरलेली असून, मंदिरापर्यंत 300 पायऱ्या चढाव्या लागतात. गिरिजा (पार्वती) चा पुत्र असल्याने याला “गिरिजात्मज” म्हणतात.
ALSO READ: विघ्नहर्ता, संकटमोचक ओझर येथील श्री विघ्नेश्वर
विघ्नेश्वर ओझर, पुणे
विघ्नहर्ता गणपती म्हणून प्रसिद्ध, हे मंदिर सातव्या क्रमांकाचे आहे. मूर्ती डाव्या सोंडेची आहे. चिमाजी अप्पांनी मंदिराचा घुमट बांधला.
ALSO READ: रांजणगावाचा श्री महागणपती: दहा हात असलेले महाशक्ती व तेजस्वी स्वरूप
महागणपती रांजणगाव, पुणे
अष्टविनायकातील शेवटचे मंदिर. मूर्ती उजव्या सोंडेची असून, त्रिपुरासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. मंदिर 9व्या-10व्या शतकात बांधले गेले.
यात्रेचे वैशिष्ट्ये-
ही यात्रा मोरगावपासून सुरू होऊन, सर्व मंदिरांना भेट दिल्यानंतर पुन्हा मोरगावला येऊन पूर्ण होते. मंदिरे 20 ते 110 किमीच्या परिसरात आहे, त्यामुळे प्रवास सुलभ आहे. गणेश आणि मुद्गल पुराणात या मंदिरांचा उल्लेख आहे. मूर्तींचे स्वरूप आणि सोंडेची दिशा प्रत्येक मंदिरात वेगळी आहे. पेशव्यांनी या मंदिरांना आश्रय दिल्याने त्यांचे महत्त्व वाढले. तसेच अष्टविनायक यात्रा ही आध्यात्मिक सुख, एकता, समृद्धी आणि विघ्ननाशासाठी केली जाते. गणपतीला जलतत्त्वाचे देवता मानले जाते, आणि ही यात्रा भक्तांना मानसिक शांती आणि आनंद देते.
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025 गणपती विसर्जन मिरवणूक; यामागील पारंपरिक आणि आधुनिक अनुभव