ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्याला सात कोटी रुपये मिळणार सोबत नोकरीही दिली जाणार; दिल्ली सरकारची मोठी घोषणा

दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. विजेत्या खेळाडूंच्या प्रोत्साहन रकमेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत एक …

ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्याला सात कोटी रुपये मिळणार सोबत नोकरीही दिली जाणार; दिल्ली सरकारची मोठी घोषणा

दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे. विजेत्या खेळाडूंच्या प्रोत्साहन रकमेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी मुख्यमंत्री क्रीडा प्रोत्साहन योजनेअंतर्गत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ऑलिंपिकमधील विजेत्यांना सरकारने रोख बक्षीस वाढवल्याची माहिती दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी दिली आहे.

ALSO READ: ठाण्यात लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक दुभाजकाला धडकला; दोन जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार परिषदेत मंत्री आशिष सूद म्हणाले की, ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला सात कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला पाच कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला तीन कोटी रुपये दिले जातील.

ALSO READ: विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारी प्रकरणात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर समर्थकांना जामीन मंजूर

पुढे म्हणाले की, ऑलिंपिकमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक विजेत्या खेळाडूला गट अ मध्ये नोकरी आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना गट ब मध्ये नोकरी दिल्ली सरकार देईल. अशी माहिती समोर आली आहे. 

ALSO READ: धक्कादायक : गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यात २० बनावट डॉक्टर आढळले

Edited By- Dhanashri Naik

Go to Source