आशी चोक्सी दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पोलंडमध्ये सुरू असलेल्या ग्रा प्रि रोक्लेविया आणि डोलेंगो स्लेस्का आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज आशी चोक्सीने महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझीशन प्रकारात दुसरे स्थान मिळविले. या प्रकारात पोलंडची ज्युलिया पिट्रोव्हेस्काने पहिले स्थान पटकाविले. गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चोक्सीने 3 पदके मिळविली होती. पोलंडमधील स्पर्धेत तिने 464.7 गुणासह दुसरे […]

आशी चोक्सी दुसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोलंडमध्ये सुरू असलेल्या ग्रा प्रि रोक्लेविया आणि डोलेंगो स्लेस्का आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताची महिला नेमबाज आशी चोक्सीने महिलांच्या 50 मी. रायफल 3 पोझीशन प्रकारात दुसरे स्थान मिळविले. या प्रकारात पोलंडची ज्युलिया पिट्रोव्हेस्काने पहिले स्थान पटकाविले.
गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चोक्सीने 3 पदके मिळविली होती. पोलंडमधील स्पर्धेत तिने 464.7 गुणासह दुसरे स्थान घेतले. पोलंडच्या या स्पर्धेत सिफ्ट कौर समरा आणि अंजुम मोदगिल यांना या प्रकारात अनुक्रमे चौथे आणि सातवे स्थान मिळाले. झेक प्रजासत्ताकच्या अॅनेटा ब्रेबकोव्हाने तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये भारताच्या अनिश बनवाला आणि निरजकुमार यांनी पुरूषांच्या अनुक्रमे 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजीत आणि 3 पोझीशन प्रकारात पदके मिळविली.