‘आशियान’ भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा आधार

लाओसमध्ये विदेशमंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर यांचे वक्तव्य वृत्तसंस्था/ वियनतियाने विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिणपूर्व आशियाई देशांची संघटना (आशियान) भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरण आणि भारत-प्रशांत दृष्टीकोनाचा आधार असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी केले आहे. या संघटनेसोबत राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आशियान बैठकीत भाग घेण्यासाठी जयशंकर हे लाओसची राजधानी वियनतियानेच्या दौऱ्यावर आहेत. आशियान-भारत विदेश […]

‘आशियान’ भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाचा आधार

लाओसमध्ये विदेशमंत्र्यांच्या बैठकीत जयशंकर यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ वियनतियाने
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दक्षिणपूर्व आशियाई देशांची संघटना (आशियान) भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरण आणि भारत-प्रशांत दृष्टीकोनाचा आधार असल्याचे प्रतिपादन शुक्रवारी केले आहे. या संघटनेसोबत राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आशियान बैठकीत भाग घेण्यासाठी जयशंकर हे लाओसची राजधानी वियनतियानेच्या दौऱ्यावर आहेत. आशियान-भारत विदेश मंत्र्यांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केले. आशियानसोबत वर्तमान राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याला भारताची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तसेच आमच्या लोकांमधील संपर्कालाही सर्वोच्च प्राथमिकता आहे. लोकांमधील संपर्क वाढविण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहाहेत. भारत-आशियान भागीदारी अधिक वृद्धींगत होत असल्याचे जयशंकर म्हणाले.
महत्त्वपूर्ण दौरा
विदेशमंत्री जयशंकर यांचा लाओस दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे, कारण यंदा भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाला एक दशक पूर्ण होणार आहे. अॅक्ट ईस्ट धोरणाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये नवव्या पूर्व आशिया शिखर परिषदेदरम्यान केली होती.  अॅक्ट ईस्ट धोरण वेगवेगळ्या स्तरांवर आशिया-प्रशांत क्षेत्रासोबत आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठीचा एक कूटनीतिक पुढाकार आहे. आशियानचे 10 सदस्य देश असून यात इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया यांचा समावेश आहे.