iPhone 16:भारतात iPhone 16 विक्री सुरू होताच दुकानाबाहेर लांबच लांब रांगा
टेक कंपनी Apple च्या iPhone 16 सीरीजची विक्री आजपासून भारतात सुरू झाली आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विक्री सुरू होताच मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मध्यरात्रीपासून लोक दुकानासमोर रांगेत उभे होते. मोबाईल घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली .
मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर चेंगराचेंगरीसारखी स्थिती पाहायला मिळाली. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, मी खूप उत्साहित आहे. मला येथे 21 तास झाले आहेत. दुकानात प्रवेश करणारा मी पहिला आहे. व्यवस्थापन खूपच चांगले आहे. iPhone 16 मालिकेत अनेक नवीन फीचर्स आहेत.
कंपनीने 9 सप्टेंबर रोजी वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंट ‘इट्स ग्लोटाइम’ मध्ये AI वैशिष्ट्यांसह iPhone 16 मालिका लॉन्च केली. यामध्ये चार नवीन आयफोन लाँच करण्यात आले. यामध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max यांचा समावेश आहे. ॲपलच्या या इव्हेंटला ‘ऍपल ग्लोटाइम’ असे नाव देण्यात आले.
आयफोन 16 मुळे डिव्हाइसच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मागील वेळी जेव्हा आयफोन 15 रिलीझ झाला तेव्हाही अशीच गर्दी पाहायला मिळाली होती.
iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये असेल, तर iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये असेल.
Edited By – Priya Dixit