ऑर्थर फिल्स विजेता, व्हेरेव्ह पराभूत

वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग फ्रान्सच्या ऑर्थर फिल्सने जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हचा पराभव करून येथे झालेल्या हॅम्बुर्ग ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याचे हे कारकिर्दीतील दुसरे एटीपी विजेतेपद आहे. जेतेपदासाठी झालेल्या अंतिम लढतीत फिल्सने अग्रमानांकित व्हेरेव्हवर 6-3, 3-6, 7-6 (7-1) अशी संघर्षपूर्ण मात केली. यापूर्वी फिल्सने गेल्या वर्षी लायन ओपन स्पर्धा जिंकली होती. 20 वर्षीय फिल्स सध्या जागतिक क्रमवारीत […]

ऑर्थर फिल्स विजेता, व्हेरेव्ह पराभूत

वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग
फ्रान्सच्या ऑर्थर फिल्सने जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हचा पराभव करून येथे झालेल्या हॅम्बुर्ग ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याचे हे कारकिर्दीतील दुसरे एटीपी विजेतेपद आहे.
जेतेपदासाठी झालेल्या अंतिम लढतीत फिल्सने अग्रमानांकित व्हेरेव्हवर 6-3, 3-6, 7-6 (7-1) अशी संघर्षपूर्ण मात केली. यापूर्वी फिल्सने गेल्या वर्षी लायन ओपन स्पर्धा जिंकली होती. 20 वर्षीय फिल्स सध्या जागतिक क्रमवारीत 28 व्या स्थानावर असून त्याने अग्रमानांकित व्हेरेव्हवर साडेतीन तासाच्या लढतीत मात केली.