अर्शद ख्वाजा हाच मास्टरमाईंड

पूजा शर्माचे अॅड. सुरेंद्र देसाई यांचा दावा पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडण्याप्रकरणी खरा मास्टरमाई&ंड रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा हाच आहे. त्याला जागा खाली करण्यासाठी आधीचे जमिनमालक पिंटो दांपत्याने नेमला असल्याची शक्यता असून त्यानेच बाऊन्सर्स आणि जेसीबी आणले असावे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून ते राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा दावा पूजा शर्मा हिचे वकील अॅड. […]

अर्शद ख्वाजा हाच मास्टरमाईंड

पूजा शर्माचे अॅड. सुरेंद्र देसाई यांचा दावा
पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडण्याप्रकरणी खरा मास्टरमाई&ंड रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा हाच आहे. त्याला जागा खाली करण्यासाठी आधीचे जमिनमालक पिंटो दांपत्याने नेमला असल्याची शक्यता असून त्यानेच बाऊन्सर्स आणि जेसीबी आणले असावे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असून ते राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा दावा पूजा शर्मा हिचे वकील अॅड. सुरेंद्र देसाई यांनी केला.
पणजीच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शुक्रवारी सुनावणीवेळी देसाई यांनी शर्मा ही पेशाने वकील असून कायद्याचा सन्मान करणारी आहे. पोलीस तपासात आपण पूर्ण सहाय्य करण्याचे तिने मान्य करताना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जबानी देण्यासाठी येण्याची तयारी दर्शवली आहे. पोलीस राजकीय दडपणाखाली काम करत आहेत. पोलीस दिशाभूल करत असून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अतिक्रमण केलेल्या प्रदीप आगारवाडेकर याला संरक्षण देत असल्याचा आरोप देसाई यांनी केला. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली तर शर्मा निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्शद ख्वाजाला जामिनावर का सोडला?
रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा हाच आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडण्या प्रकरणी खरा मास्टरमाइंड असल्याचा दावा अॅड. देसाई यांनी केला. बाऊन्सर्स आणि जेसीबी आणून धमकावणी प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करून चार दिवस पोलीस कोठडीत ठेवले होते. त्याला जामिनावर सोडण्यात आल्यावर तातडीने शुक्रवारी न्याय दंडाधिकाऱ्यासमोर समोर त्याची फौजदारी कायद्याच्या कलम- 164 खाली जबानी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांचे हे वागणे संशयास्पद आहे. अर्शद ख्वाजा आणि अन्य काही जणांनी रमझानच्या महिन्यात आगरवाडेकर कुटूंबियाचे घर पाडण्याप्रकरणी डावपेचाची आखणी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कदाचित शर्मा हिने ज्यांच्याकडून जागा खरेदी केली होती, त्यांच्याकडून ख्वाजाला सुपारी मिळाली असळण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात शर्मा यांचे नाव नाहक गुंतले गेले असून जमीन खरेदी करण्यात आपल्या अशिलाने कोणती चूक केली, ते दाखवा असे देसाई म्हणाले.