अंगणवाडी साहाय्यिकेवर हल्ला करणाऱ्या महिलेला अटक करा

अंगणवाडी नोकर संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन बेळगाव : अंगणवाडीतील लहान मुलांकडून घराजवळील फुले तोडल्याच्या कारणावरुन अंगणवाडी साहाय्यिकेला मारहाण करण्यात आली आहे. उचगाव ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या बसुर्ते येथील अंगणवाडी साहाय्यिका सुगंधा गजानन मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. लहान मुलांनी फुले तोडल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक […]

अंगणवाडी साहाय्यिकेवर हल्ला करणाऱ्या महिलेला अटक करा

अंगणवाडी नोकर संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
बेळगाव : अंगणवाडीतील लहान मुलांकडून घराजवळील फुले तोडल्याच्या कारणावरुन अंगणवाडी साहाय्यिकेला मारहाण करण्यात आली आहे. उचगाव ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या बसुर्ते येथील अंगणवाडी साहाय्यिका सुगंधा गजानन मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. लहान मुलांनी फुले तोडल्याच्या कारणावरुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अंगणवाडीला आलेल्या मुलांना शौचालयाला घेऊन जाताना अंगणवाडी शेजारी असलेल्या घराजवळील फुले मुलांनी तोडली. या कारणातून अंगणवाडी साहाय्यिका सुगंधा मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. कल्याणी जोतिबा मोरे या महिलेने सदर अंगणवाडी साहाय्यिकेला मारहाण केली असून यामध्ये सुगंधा मोरे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने जखमी अंगणवाडी साहाय्यिकेला मदत करावी, तर हल्ला करणाऱ्या कल्याणी मोरे हिला अटक करावी, अशी मागणी राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्षा दो•व्वा पुजारी, मंदा नेवगी, जी. एम. जैनेखान, गोदावरी पुजारे आदी उपस्थित होते.