बी-बियाणे, खते वेळेवर पुरविण्याची व्यवस्था करा
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळ निवारण-मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक : कृती आराखडा तयार करण्याची पालकमंत्र्यांची सूचना
बेळगाव : उन्हामुळे सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते वेळेवर पुरविण्याची व्यवस्था करावी, जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी सकाळी दुष्काळ निवारण, तसेच मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जनावरांना पाणी आणि चाराटंचाई भासणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष द्या. यंदा पुरेसा पाऊस होणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीतपणे वाहत राहील यासाठी नाले, तलाव यांचीही स्वच्छता हाती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन पावसाळ्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठीचा कृती आराखडा तयार करा. तसेच पावसाला सुरुवात झाल्याबरोबर लगेचच बाजारामध्ये नकली बी-बियाणे, खत पुरवठा होणार नाही, यासाठी सावधगिरी बाळगा. तसेच पावसामुळे घर कोसळल्यानंतर नुकसानभरपाई देताना 2019 मध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी घरांच्या प्रवेशद्वाराजवळ गोठे असतात. अतिवृष्टी झाल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून लोक स्थलांतर करतात. मात्र अशी घरे पडल्यास नुकसानभरपाई मिळत नाही हे लक्षात आणून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कुत्र्यांचे हल्ले चिंताजनक बाब
बेळगावसह परिसरात कुत्र्यांचे हल्ले ही चिंताजनक बाब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. तेव्हा त्यावर योग्य उपाययोजना करा, अशी सूचना त्यांनी केली. जिल्ह्यात 2023-24 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या भरपाईसाठी एकूण 316 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. 3,74,066 शेतकऱ्यांना 316 कोटींची नुकसानभरपाई दिली आहे. आधार लिंक नसल्यामुळे 23 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी व त्यांच्यासमोरील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. उर्वरित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. तसेच 105 गावांना दररोज 630 टँकरद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. तसेच चारा बँकांमधूनही 580 टन चारा पुरवठा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील जलाशयामधून पाणीसाठा मुबलक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणी सोडल्यास त्याचा फायदा होईल. दुष्काळ व्यवस्थापनासाठी 35 कोटी निधी उपलब्ध होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलाव स्वच्छ करण्यासाठी निविदा मागविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी खात्याचे उपसंचालक शिवनगौडा पाटील यांनी बी-बियाण्यांच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश तसेच जिल्हा पंचायत, पशू संगोपन, पाणीपुरवठा मंडळ, ग्रामीण पेय जल विभाग, केयुआयडीएफसी व अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी बी-बियाणे, खते वेळेवर पुरविण्याची व्यवस्था करा
बी-बियाणे, खते वेळेवर पुरविण्याची व्यवस्था करा
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळ निवारण-मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक : कृती आराखडा तयार करण्याची पालकमंत्र्यांची सूचना बेळगाव : उन्हामुळे सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असली तरी यंदा समाधानकारक पाऊस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते वेळेवर पुरविण्याची व्यवस्था करावी, जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी […]