अर्जुनची मुलगी माहिका लवकरच बॉलिवूडमध्ये
अर्जुन रामपालचा ‘क्रॅक : जीतेगा तो जिएला’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. आता अर्जुनची मोठी मुलगी माहिका रामपाल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माहिका लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची माहिती अर्जुनने दिली आहे.
माहिका अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी इच्छुक आहे. शालेय दशेत तिने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. लंडनमधील मेट फिल्म स्कूलमधून तिने पदवी मिळविली आहे. चित्रपट निर्मितीचा प्रत्येक पैलू जाणून घेण्याची तिची इच्छा होती. चित्रपट निर्मिती करणे हे सोपे काम नसल्याची जाणीव तिला आहे. अभिनयाच्या क्षेत्रात ती यशस्वी ठरेल असा विश्वास असल्याचे अर्जुनने म्हटले आहे.
मी माझ्या कारकीर्दीत उतारचढाव अनुभवले आहेत. जेव्हा काहीच सुरळीत नसते, तेव्हा काय वाटते हे मला माहित असून याची कल्पना माहिकाला दिली आहे. आतापर्यंत जे काही मी शिकलो, माझे अनुभव तिला सांगू शकतो. परंतु हा प्रवास तिलाच करावा लागणार आहे. या मार्गावर स्वत:लाच वाटचाल करावी लागते. केवळ ग्लॅमर आणि चाहत्यांसाठी बॉलिवूडमध्ये येण्याची इच्छा असेल तर चुकीचे ठरेल असे अर्जुनने म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी अर्जुनची मुलगी माहिका लवकरच बॉलिवूडमध्ये
अर्जुनची मुलगी माहिका लवकरच बॉलिवूडमध्ये
अर्जुन रामपालचा ‘क्रॅक : जीतेगा तो जिएला’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. आता अर्जुनची मोठी मुलगी माहिका रामपाल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माहिका लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची माहिती अर्जुनने दिली आहे. माहिका अभिनयाच्या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी इच्छुक आहे. शालेय दशेत तिने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. लंडनमधील मेट फिल्म स्कूलमधून तिने पदवी मिळविली […]