Satara News : सातारा तालुक्यातील खेडगटात समर्थकांमध्ये वाद; पोलीस परिस्थिती नियंत्रणात

                           निवडणूक काळात खेडगटमध्ये तणाव सातारा :सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान सातारा तालुक्यातील खेडगट परिसरात दोन गटांतील समर्थकांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. कोणताही […]

Satara News : सातारा तालुक्यातील खेडगटात समर्थकांमध्ये वाद; पोलीस परिस्थिती नियंत्रणात

                           निवडणूक काळात खेडगटमध्ये तणाव
सातारा :सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान सातारा तालुक्यातील खेडगट परिसरात दोन गटांतील समर्थकांमध्ये वादावादीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून, प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.