अर्जेंटिनाचा पेरुवर एकतर्फी विजय
वृत्तसंस्था / मियामी गार्डन्स
कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत येथे शनिवार खेळविण्यात आलेल्या प्राथमकि गटातील सामन्यात लायोनेल मेस्सीच्या गैरहजेरीत अर्जेंटिनाने पेरुचा 2-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. दुखापतीमुळे मेस्सी या सामन्यात खेळू शकला नाही.
या सामन्यामध्ये अर्जेंटिनातर्फे लॉटेरो मार्टिनेझने 2 गोल केले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पेरुच्या बचाव फळीची कामगिरी भक्कम झाल्याने अर्जेंटिनाला आपले खाते उघडता न आल्याने गोलफलक कोराच होता. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर 47 व्या मिनिटाला मार्टिनेझने अँजेल डी. मारियाने दिलेल्या पासवर अर्जेंटिनाचे खाते उघडले. 86 व्या मिनिटाला मार्टिनेझने स्वत:चा वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करुन पेरुचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत आता मार्टिनेझ 4 गोलांसह आघाडीवर आहे. गेल्या मंगळवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने चिलीचा 1-0 असा निसटता पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. शनिवारचा त्यांचा प्राथमिक गटातील शेवटचा सामना होता. अर्जेंटिनाचा संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. या सामन्याला सुमारे 64 हजार फुटबॉल शौकिन उपस्थित होते. शनिवारी या स्पर्धेतील ओरलँडो येथे झालेल्या सामन्यात कॅनडाने चिलीला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. आता अर्जेंटिनाचा बाद फेरीतील प्रतिस्पर्धी ब गटातील आघाडीचा संघ रविवारी येथे उशिरा होणाऱ्या सामन्यानंतर निश्चित होईल. 2021 साली अर्जेंटिनाने या स्पर्धेचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला होता.
Home महत्वाची बातमी अर्जेंटिनाचा पेरुवर एकतर्फी विजय
अर्जेंटिनाचा पेरुवर एकतर्फी विजय
वृत्तसंस्था / मियामी गार्डन्स कोपा अमेरिका चषक फुटबॉल स्पर्धेत येथे शनिवार खेळविण्यात आलेल्या प्राथमकि गटातील सामन्यात लायोनेल मेस्सीच्या गैरहजेरीत अर्जेंटिनाने पेरुचा 2-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. दुखापतीमुळे मेस्सी या सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यामध्ये अर्जेंटिनातर्फे लॉटेरो मार्टिनेझने 2 गोल केले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पेरुच्या बचाव फळीची कामगिरी भक्कम झाल्याने अर्जेंटिनाला आपले खाते उघडता न आल्याने […]