अर्चना घारे -परब यांनी घेतली शरद पवारांची भेट

सावंतवाडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ,श्री. शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी शिष्टमंडळासह भेट घेतली. वेंगुर्ला तालुक्यातील मौजे वेळागर येथील …

अर्चना घारे -परब यांनी घेतली शरद पवारांची भेट

सावंतवाडी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ,श्री. शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी शिष्टमंडळासह भेट घेतली. वेंगुर्ला तालुक्यातील मौजे वेळागर येथील पर्यटन विकास प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची अधिकची जमीन अधिग्रहित होत आहे. अशा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवारांना मार्ग काढण्याची विनंती केली. वेळागर येथील स्थानिक नागरिकांचा पर्यटन विकास प्रकल्पास विरोध नाही, मात्र अधिग्रहित होत असलेल्या अधिकच्या जमिनीतून शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन वगळण्यात यावी, तसेच गावठाण क्षेत्र वगळण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. स्थानिक शेतकऱ्यांची सदर मागणी अतिशय रास्त असून याबाबतीत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून निश्चित तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन शरद पवारांनी दिले. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती सौ. अर्चना घारे – परब यांनी दिली.यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, शेतकरी संघटना अध्यक्ष राजू आंदुर्लेकर, सचिव हनुमंत गवंडी, सल्लागार भाऊ आंदुर्लेकर, गजानन गवंडी, शेखर नाईक, संजय आरोसकर, तातू आंदुर्लेकर, प्रकाश गवंडी, महेश आंदुर्लेकर आणि चंद्रकांत नाईक उपस्थित होते.

Go to Source