अरविंदला चूक पडली महागात
लढतीबरोबर आघाडीही निसटली
वृत्तसंस्था/ शारजाह
भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमला उशिरा झालेली एक चूक महागात पडून शारजाह मास्टर्सच्या सातव्या फेरीत इराणच्या बर्दिया दानेश्वरकडून केवळ पराभूत व्हावे लागले नाही, तर आघाडीही गमवावी लागली. अव्वल स्थानावरून घसरून अरविंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सॅम शँकलँडने अमेरिकन हॅन्स मोके निमनचा पराभव करून इराणी खेळाडूशी बरोबरी साधली आहे.
चूक होईपर्यंत अरविंद त्याच्या खेळात अव्वल होता. पण शेवटच्या क्षणी त्याने डावपेचात्मक चूक केली आणि खेळ इराणी खेळाडूच्या बाजूने झुकला. आणखी एक भारतीय अर्जुन एरिगेसीला इराणच्या परहम मगसूदलूच्या भक्कम बचावाला भेदता आले नाही आणि त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. या बरोबरीमुळे अर्जुन दानेश्वर आणि शँकलँड या आघाडीच्या जोडीपेक्षा अर्ध्या गुणाने मागे पडला आहे. अन्य निकाल : व्ही. प्रणव पराभूत विरुद्ध वोलोदार मुर्झिन, संकल्प गुप्ता विजयी विरुद्ध डी. बोगदान-डॅनियल, शमसिद्दीन वोखिदोव्ह विजयी वि. निहाल सरिन, अभिमन्यू पुराणिक विजयी वि. पी. इनियान, अलीशेर सुलेमेनोव्ह विजयी वि. डी हरिका
Home महत्वाची बातमी अरविंदला चूक पडली महागात
अरविंदला चूक पडली महागात
लढतीबरोबर आघाडीही निसटली वृत्तसंस्था/ शारजाह भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमला उशिरा झालेली एक चूक महागात पडून शारजाह मास्टर्सच्या सातव्या फेरीत इराणच्या बर्दिया दानेश्वरकडून केवळ पराभूत व्हावे लागले नाही, तर आघाडीही गमवावी लागली. अव्वल स्थानावरून घसरून अरविंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सॅम शँकलँडने अमेरिकन हॅन्स मोके निमनचा पराभव करून इराणी खेळाडूशी बरोबरी साधली आहे. चूक होईपर्यंत […]
